या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्यविषेचन व दिग्दर्शन. २३ इझवारिश अशी संज्ञा आहे, आणि तदितरांस पाझन्द म्हणतात. हुझवारिश म्हणजे व्यवहारातीत व पाइन्द म्हणजे अर्थव्यंजक होय. जेव्हां, इराणी भाषा आरबी हारफांत (वर्णोत) लिहिण्यांत फारशी भाषा. येते, तेव्हां ती फारसी हे अभिवान पावते. ह्याच भाषेत, फिरसी नामक फारशी कवीचे शहानामा नांवाचें, इ. स. १००० शतकांतले सुप्रसिद्ध काव्य आहे; आणि ह्यांत आरबी शब्दांचा भरणा पुष्कळच कमी आहे. तथापि, मुसलमानी अमलाखालींच इराण गेल्यानें, फारसी भाषेत आरबी शब्द दिवसानुदिवस ज्यास्त प्रमाणाने आपला शिरकाव करीत चालले, ही गोष्ट विस रतां कामा नये. ३. ग्रीक अथवा हेलेनिक ही मृतभाषाच आहे; आणि डॉरिक, इऑलिंक, आयोनिक, व अटिकू, अशा ज्या तिच्या प्राचीन काळच्या शाखा असत, त्या देखील सांप्रत व्यवहारांत नाहीत. मात्र, तिचे प्रस्तुत काळ अन्य पोटभेद होऊन, ते हल्ली ग्रीस देशांत प्रचारांत आहेत. ग्रीक भाषेचे पोटभेद. ४. ल्याटिन किंवा इतालिक ही देखील मृतभाषाच होय. हिच्या आँस्कन् आणि अं ब्रियन् अशा प्राक्कालीन शाखा असत. परंतु, त्यासुद्धा हल्ली प्रचारातीतच आ- हेत. तथापि, ह्या भाषेपासून अनेक पोटभेद झाले आहेत; व ते इटली, फ्रान्स, मोव्हेन्स, स्पेन, आणि पोर्चुगल, या देशांत फैलावले असून, ते त्या त्या देशांतील लोक बोळतात. ल्याटिन भाषेचे पोटभेवू.