या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्यविवेचन व दिग्दर्शन. ४५ शेवटीं, ह्या प्रचंड साम्राज्याची सर्व इमारत ढांसळून, त्याचे लहान लहान तुकडे झाले, आणि चीन, सैबीरिया, इराण, तुर्कस्थान, व रूस, येथे निरनिराळी मोगली राज्य स्थापन करण्यांत आली. परंतु, ती सुद्धा फार वेळ टिकली नाहींत. इ. स. १३६० साली, चिनी लोकांनी मोगली घराणे हद्दपार केले, आणि त्यामुळे ह्या राजघराण्याचा त्या देशांत अन्तच झाला. पुढें, पंधराव्या शतकांत, रूस देश देखील त्याच्या हातांतून गेला, पण, मध्य आशि यांत, ते फिरून सरसावले, व तैमूरलंगाने बहादुरी केल्या मुळे, काराकोरमपासून इराण व आनाटोलियापर्यंत, त्याचा अंमल बसला. तथापि, कालगतीने हेंही सर्व लयास गेले, आणि मोगली घराण्याचा अंमळ फक्त जगताईमध्ये मात्र राहिला. येथूनच बाबरने हिंदुस्थानावर स्वारी केली, व तेथे मोगली बादशाही स्थापिली. - यूरोपांत राहणाऱ्या मोगली लोकांची वस्ती ठिकठि काणी पसरलेली दिसते. कित्येक व्होल्गा नदीच्या दोन्ही तटावर राहतात, आणि कित्येक कास्पियन् समुद्रावर आ स्त्राखानजवळ आपली कालक्रमणा करितात. कांहीं कांहीं आलोट किंवा काळमुक वंशांतले आहेत, व ते सेंबिर- स्कच्या आग्नेयी कोणत्यावर असतात. ह्यांचा शिरकाव यूरोपखंडांत इ० स० १६६२ साठी झाल्याचे कळून येतें. असो. अशा प्रकारें मोगली लोकांचा उत्कर्ष असून, यांचा चीनपासून व्होल्गा नदीपर्यंत सर्वत्र विस्तार असतांही, त्यांची भाषा केवळ निःसत्वच राहिली; आणि