या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भम्प त्या कारणानें, मोगली भाषेची स्थिति देखील तुंगुसी भाषेप्रमाणेच आहे, असें झटलें असतां कांहीं एक बाध येणार नाहीं. तुर्की भाषा. तुर्की भाषेचा विस्तार बराच मोठा असल्याचे दिसते. कारण, लेनानदी, उत्तरमहासागर, व ऑट्रियाटिक समुद्र, यांच्या यो गानें जो अनियमित त्रिकोणाकृति प्रदेश बनतो, त्यांतच ह्या भाषेची व्याप्ति आहे. तथापि, यूरोपांतील तुर्की लोकांची संख्या सुमारे २०,००,००० असून, त्यापैकी असंकीर्ण तुर्क अजमा ७,००,००० असावेत, असे शफरिक चें मत आहे. तुर्की लोकांना चिनी लोक हुंगनू म्हणत. ह्यांनीं इ० स० पूर्वी २०६ वर्षांच्या सुमारास, चीनच्या पश्चिमेकडील आशिया- खंडांतील बन्याच मुलुखावर आपले वर्चस्व स्थापिलें होतें. परंतु, कालान्तरानें चिनी लोकांनी त्यांस जिंकून हांकून लाविल्यामुळे ते सरकत सरकत पश्चिमेकडे गेले; आणि शनैः शनै: त्यांनी आपला प्रवेश यूरोप खंडांतही केला. पुढे इ० स० १६८ सालाच्या सुमारास, तुर्की लोकार्नी व्होल्गा नदी व अझोफसमुद्र यांच्या दरम्यानचा प्रदेश व्यापून टाकिला, आणि हराण, आरमीनिया, शीखान, इत्यादि ठिकाणी सुद्धा त्यांनी तुर्कीस चिनी लो- कांनी दिलेली संज्ञा. १ स्वीडन देशाचा काट्रन नामक एक मोठा प्रवाशी होऊन गेला असून, त्याने तुराणी भाषासंबंधी घराच शोध केला आहे. मॉक्समुलर कृत भाषापरीक्षण (Survey of Languages) पहा.