या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्यविवेचन व दिग्दर्शन. ४९ हाँ होत. उरणहट जात चूलिम नदीवर राहते, व बर- बास लोक इरटिश आणि ओबी नदी, यांच्या मधील पठार प्रदेशावर वस्ती करतात. सैबीरीच्या भाषेत, मोगली, सामोयेडी, व रूस भाषांतील अनेक विजातीय शब्दांचें बरेंच मिश्रण आहे. तथापि, तेही मुख्य शाखेतील शब्दांश पुष्कळ साम्य पावतात. आशिया खंडाच्या ईशान्येस व लेना नदीच्या दोन्ही बाजूला, याकुत नांवाचे लोक राह- याकुती व तक भा- पांचे सूक्ष्मावलोकन तात. ह्यांच्या एकंदर संख्येचा अजमास लागत नाहीं. तथापि, इ० स० १७९९ साली, फक्त पुरुषांचीच टीप १०,०६६ झाली असल्याचे कळून येतें. रूस लोकांस ह्यांची माहिती प्रथमतः इ० स० १६२० साली झाली. हे आपणांस सख (शक ? ) म्हणवितात, आणि ह्यांची मूळ वस्ती बैकल सरोवराच्या ईशान्येस असल्याचे समजतें. भाषेचा अपभ्रंश ज्या कारणांनी होतो, त्या कारणांचा संस्कार व अनिष्ट परिणाम याकुती भाषेवर न झाल्यानें, ह्या भाषेचें मूळचें स्वरूप अथवा शब्दाचें मूलरूप फारसें बदलले नाहीं; किंवा त्यांत म्हणण्यासारखा फेरफारही झाला नाहीं. त्यामुळे, उसमानी सारख्या प्रौढ आणि नांवाजलेल्या तुर्की भाषांचे परिशीलन करण्यास, ती एक गुरुकिल्लीच आहे, असे म्हटले असतां चालेल. . तुर्की तार्तरांत किरगिज जात विशेष नांवजलेली आहे. हिची वस्ती, ओबी आणि येनिसी यांच्या दरम्यानच्या प्रदेशांत, प्रथमतः किरगिज लोक.