या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्यविषेचन व दिग्दर्शन. ५रं ह्याचा पुढें कालदेशवर्तमान पाहून इस्तुघरल नांवाच्या त्याच्या मुलाने आलादिनच्या हाताखाली नोकरी पतकरली. हा कोनी ( इकोनियम्) चा सेलजुक घराण्यांतील सुलतान होता. त्यामुळे त्याला बरेंच पाठबळ मिळून, त्यानें ग्रीक व मोगली लोकांवर स्वारी केली, आणि फ्रीजिया प्रांत आपलासा करून घेतला. पुढे, तेराव्या शतकाच्या शेवटीं, कोनीचे सुलतान निर्बल झाले, व तुर्की लोक दिवसानुदिवस जोरावत चालले. तेव्हां, अर्थातच, उस्मा- नासारख्यास आपले शौर्य प्रकट करण्यास योग्य सांधे सांपडून, तो रणभूमीवर आला, आणि बिथीनियांत डोंग- राळ वाटांनी शिरून, बायझानशियमूच्या बादशाही सैन्याशी झुंजला, व त्यांचा भगदी भराभव केला. मुलगा औरखान हा देखील मोठा पराक्रमी होता, ह्यानें इ० स० १३२७ व १३३० साली, निकोमीडिया आणि नीशिया, हे प्रान्त सर केले, व हेलेस्पांटवर आप- ला मोरचा फिरविला. तदनंतर त्याने आपल्याला पाद- शहाचा किताब घेतला, आणि आपल्या राजसभेला "जंगी दरबार" असें नामधेय दिलें. ह्याचाच मुलगा सुलेमान होय. ह्यानें, इ० स० १३५७ साली, हेलेस्पांट वलांडून ग्यालिपोलि व सेस्टास काबीज केले, आणि त्यामुळे डार्ड- नेल्स देखील त्याच्या ताब्यांत आले. पुढे, पहिल्या मुरादनें इ० स० १३६२ साली आद्रियानोपलू घेतलें, व तेंच आपल्या राजधानीचें ठिकाण करून, मासिडोनिया सर केलें. इतकेच नव्हे तर, इ० स० १३८९ साली, यानें बल्गेरिया, सहिया, आणि क्रोटिया, यांच्या संयुक्त