या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाशास्त्र. सैन्यास कोसवापोलीच्या लढाईत जिंकलें. अशाच प्रकारें बायझेटनें पण क्रम चालविला, व थेसली आणि थर्मापिली घेऊन, पिलापोनीसस उध्वस्त केले. ह्याला अटकाव करण्यासाठी, जर्मनीचा बादशहा सिगि: स्मंड हा देखील, फ्रेंच, जर्मन, व स्लॉव्ह सैन्यानिशीं त्याजवर चाल करून गेला. परंतु, त्याचे कांहीं एक न चालतां, ३० स० १३९९ साली, निकापोलीसच्या लढा- ईत त्यालाच हार खावी लागली. पुढे, बायझेट्ने बोस्निया पण घेतले; आणि त्याचा इरादा कुस्तंतुनिया सर कर- ण्याचा होता; इतक्यांत, तैमूरचा व त्याचा सामना होऊन, ग्यालेशियांत अंगोरा ( अंकिर ) येथे युद्ध जुंपलें, व इ० स० १४०२ साली बायशेट्चा पराभव झाला. तदनन्तर, तैमूर मरण पावला, आणि इ० स० १४१३ साळी, पहिल्या महमदाच्या कारकीर्दीत, तुर्की लोकांची फिरून जमाजम होऊन, इ० स० १४२१ सालीं, दुसन्या मुरादला पहिले सर्व वैभव पुनश्च प्राप्त झाले. त्यामुळे, तो पुन्हा सज्ज झाला, व त्याने आपले सैन्य आणखी एकदां डॉन्यूब नदीवर पाठविलें. ह्यावेळी सुद्धां, हंगारी व स्लॉव्ह लोकांनी हरकत केली. परंतु, इ० स० १४४४- साळी वर्णा लढाईत, व इ० स० १४४८ साली कोसवा लढाईत, मुरादला पूर्ण जय मिळून त्यानें कुस्तंतुनिये- वर हल्ला केला. इतकेच नव्हे तर, सर्व यूरोपांतले वीर पुरुष त्याच्या छातीवर असूनही त्याने त्यास झुगारून दिले, आणि ता. २६ मे इ० स० १४५३ रोज, त्यानें मोठ्या बहादुरीने से शहर घेतले व तेथें आपली राज- धानीही स्थापिली.