या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्य विवेचन व दिग्दर्शन. ५३ असो. यूरोपांतील तुर्कस्थान, आशिया खुर्द ( म्हणजे तुर्कीत इराणीचे आशिया मायनर ), व सीरिया, झालेले मिश्रण व येथील तुकों लोक, खोरासान आणि राण येधूनच आले. हे सेल- झालेले मोडत्व, जुक घराण्यांतले असून, मध्ययुगांत कांहीं कालपर्यंत, त्यांचें इराणांत देखील राज्य होते. त्या- मुळे, तुर्की व इराणी यांचे परस्पर विशेष संघट्टन होऊन, तुर्की भाषा जरा जोरावत चालली. कारण, इराणी शब्द, इराणी भाषाप्रचार, आणि इराणी विद्या, इयादींची तोत भर पडून, ती सहजीव ऊर्जित दशेस येऊ लागली. पुढे, कालान्तरानें, तुर्की लोक देखील इतस्तत: पसरत चालले, आणि त्या योगानें त्यांच्या भाषेचाही आपोआप फैलाव होत गेला. त्यांची एकंदर संख्या सुमारे ९,१०,००,००० पासून १,२०,००,००० पर्यंतच होईल. तथापि, त्यांचें राज्य आशिया, यूरोप, व आफ्रिका, या तिन्ही खंडांत असल्यानें, तुर्कस्थान, सीरिया, मिसर देश ( ईजिप्त), त्रिपोली, आणि ट्यूनिस, या देशांत, व सरकार दरबारांत, तुर्की भापाच चालते. फार तर काय सांगावें, पण, इरा- गांत तेहरान वगैरे ठिकाणी मुद्धां, तुर्की भाषेचेच चलन आहे. त्यामुळे, ह्या भाषेला सर्व प्रकारें प्रोत्साहन व राजा- श्रय मिळून, ती हळू हळू पुढेच सरसावत आहे, हे विशेष रीतीने सांगावयास नलगे. , ४ फिनी भाषेची जन्मभूमि यूरल पर्वतांत असून, तेथूनच ह्या लोकांचा प्रसार पूर्वेस, पश्चिमेस, आणि दक्षिण दिशेकडे काळ्या समुद्रापर्यंत झाला फिनी भाषा,