या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा, भाषेची उपपत्ति, व ध्वनि, शब्द, आणि श्रवणविचार. मागील भागांत, भाषाशास्त्राचें एकंदर दिग्दर्शन क भाषोत्पत्तीचे विवे रून, त्याबद्दलची सामान्य माहिती वाचकास दिली. सबब, प्रस्तुत भागांत, भाषेच्या उपपत्तीसंबंधींच अवश्य तें विवेचन यथावकाश करण्याचे योजिले आहे. यापूर्वी, भाषेची व्याख्या आम्ही प्रथमारंभीच दिली भाषेची व्याख्या आहे. त्यावरून, आपले मनोगत व्यक्त व तीत झालेला समा- करण्यासाठी, अथवा आपल्या मनां- वेश. तील कल्पनातरंगांचें उद्बोधन व्हावें म्हणून, किंवा आपले एकंदर विचार एकमेकांस प्रदर्शित करता यावेत एतदर्थ, जी वाकूसंज्ञा प्रचारांत येते, ती भाषा होय, हे वाचकांच्या लक्षांत सहजींच आले असेल. अर्थात्, होत पशु, पक्षी, कीटक, इत्यादि नाना प्रकारच्या कोटीतल्या प्राणिमात्राच्या भाषेचा बिलकुल समावेश होत नाहीं. इतकंच नव्हे तर, करपैलवी, नेत्रपेलवी, १ हाताच्या बोटांनी नानाविध संज्ञा करून आपले मनोगत चन. व्यक्त करण्याचा प्रकार. ३ नेत्रकटाक्षांनी आपले हेतु प्रदर्शित करण्याची पद्धत.