या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ५७ मिताक्षरी, वगैरे मनुष्यप्रणीत ज्या ज्या भाषा आहेत, त्यांचा देखील अंतर्भाव होत करणें, यथान्याय होणार नाही. तेव्हां उघडच, ह्या भूतलावर प्रचारांत असलेला जो जो मानवी वागविभव हग्विषयभूत होतो; किंबहुना, हृद्गत असलेला जो जो मनस्तरंग वाचेने व्यक्त करण्यांत येतो; त्याचेच येथे यथावकाश विवेचन करण्याचे योजिले आहे. समुदाय. असो. भाषा म्हणजे अनेक शब्दांचा केवळ समुदा- यच होय, असे म्हणण्यास हरकत भाषा म्हणजे शब्द नाहीं. तथापि, ज्या शब्दाच्यायोगानें भाषा बनते, त्या शब्दाची व्याख्या काय, व तो कोठें, आणि कसा उत्पन्न होतो, इत्यादि विष यक विवेचन फार महत्त्वाचे असल्या कारणानें, प्रथमतः त्याबद्दलचाच अवश्य तो विचार येथें करतों. शब्दाचें आदिकारण ध्वनि आहे, अर्से व्यवहाररीत्या . 2 १ ही भाषापद्धति केवळ कृत्रिम असून, अगदी नियंत्रित आहे. हीत, अ, आ, इत्यादि वर्णोच्या ठिकाणी क, का याराखडीचा उपयोग करतात; आणि त्याचप्रमाणे ख, घ, च, त, य, र, ल, ह, वळ, या अक्षरांच्या जागीं ग, ङ, ट, प, श, ष, स, च, आणि क्ष, यांचा परस्पर आदेश होतो. ही भाषा व्यवहारांत काणी कधी सुद्धा चोलत नाही; व म्हणूनच तिचा तादृश काहीएक उपयोग नाही. मात्र, ती दुसऱ्याला समजू नये, इतक्याच हेतूनें ती कचित् बोलण्यांत येते आणि तिची मोड खाली लिहिलेल्या श्लोकावरून व्यक्त होतेः- - अht खगौ घडी चैव चटौ तपौ परस्परम् । यशौ रषौ लसौ मैव हवौ कालौ मिताक्षरी |