या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाशास्त्र. म्हणणे सयुक्तिक दिसतें. किंबहुना, शब्द म्हणजे ध्वनिविकृतिच होय, असे म्हटले असतांही बाघ येणार नाहीं. तथापि, आणखी सूक्ष्म विचार केला, व तत्वदृष्टीनें पाहिले, म्हणजे ध्वनि कसा आणि कोणत्या ठिकाणी उत्पन्न होतो, हें सहज लक्षांत येतें. कारण, शब्दगुणच आकाश असल्याविषय, कवि, पंडित, व ज्ञाते, यांची समजूत आहे. इतकेंच तव्हें तर, ही गोष्ट श्रुतिप्रमाणभूतही आहे. फार तर काय सांगावें, पण ती सिद्धान्ताने देखील शाबीत ठरत आहे. शब्दाचे आदिका- रण ध्वनि, ध्वनि हा आका आकाश है शब्दगुणच आहे, अ शाचा गुण आणि शाविषयी कालिदास कवीच्या काव्यांत म्हणूनच, आणि नाटकांत स्पष्ट उल्लेख आहे. अथात्मनः शब्दगुणं गुणज्ञ: पदं विमानेन विगाहमानः | रत्नाकर वीक्ष्य मिथः स जायां रामाभिधानो हरिरित्युवाच ॥ १ ॥ ( रघुवंश. १३ वा सर्ग. ) ++ येद्वेकालंविधत्तः श्रुतिविषयगुणायास्थिता व्याप्य विश्वम् । ( शाकुन्तल ): बृहदारण्यकांत सुद्धां यासंबंधों आधार मिळतो. एतस्मिन्नुखलवक्षरे गार्ग्याकाश ओतश्च प्रोतश्च । ( बृहदारण्यक. ) ह्यावरून, शब्द किंवा ध्वनि हा गुण आकाशाचाच असून,