या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"भावाशान होऊन, असंख्य वांचितरंग उद्भवतात; व त्यायोगान, आकाशाचा नित्य गुण जो शब्द, त्याचा प्रादुर्भाव होण्या- ला सहजींच अवकाश मिळतो. अर्थात्, कारणामुळे कार्य घडत असल्यानें, जावतकालपर्यंत कारणाला अवकाश नाहीं, तावत्कालपर्यंत कार्य देखील घडून येत नाहीं. आणि म्हणूनच, शब्द किंवा ध्वनि हा जरी आकाशाचा निव्य. गुण आहे, तरी निमित्ताभावात् तो सदैव प्रच्छन्नावस्थेत, व अतएव अव्यक्त असतो; आणि कारण उद्भवल्यावर तो आपोआप तत्क्षणींच व्यक्त होतो. असो. आघातासारख्या निमित्त कारणांनी शब्द किंवा ध्वनि व्यक्त झाल्यावर, वायूंत वीचितरंग उठतात, व त्याचा प्रवाह कर्णेन्द्रियावर जाऊन एकदम थडकतो. त्यामुळे, ध्वनि आणि श्रोत्रेंद्रिय यांचा संयोग होऊन, मज्जातंतूला तत्काल धक्का पोहोचतो, व मन जागृत झाल्यानें, तें आ- त्म्यालाही लागलींच प्रबोधित करते. पुढे, आत्मा हा शरी- रस्थ राजाच असल्यामुळे, तो आपल्या इच्छेप्रमाणे वाचेचे आणि इतर सर्व इंद्रियांचे व्यापार चालवितो, व असंख्य घडामोडी करतो. आतां, मन किंवा आत्मा जागृत असतांना, इन्द्रियांचे १ ह्या इन्द्रियांत पांच ज्ञानेन्द्रिय व पांच कर्मेन्द्रिय, यांचा स मावेश होतो. १ कान, २ डोळे, ३ नाक, ४ जांभ, व ५ त्वचा, हीं पंच ज्ञानेन्द्रियें असून, गुदु, २ उपस्थ, ३ हाल, ४ पाय, व ५ वाचा, ह्रीं पंच कर्मेन्द्रियांत मोडतात. 1 १ श्रोत्रंत्वक चक्षुषी जिल्हा नासिका चैव पंचमी । पायूपस्थं हस्तपादं वाक्चैव दशमी स्मृता ॥ ९० ॥ ( मनुस्मृति अ० २.१ ) · मन हे ज्ञानेन्द्रिय पैकीच आहे, अशीही कित्येक कल्पना करतात. 1