या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषोपपत्ति, इन्द्रियांचे व्यापार चालण्याला, ध्वनीखे- रीज अन्य कारण. ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ६१ व्यापार चालण्याला केवळ ध्वनिध कारण होतो, असे नाहीं. तर, ध्वनी- खेरीज, दुसरी देखील नानाविधकारणे उत्पन्न होतात, आणि त्या योगानें दैहिक व्यापार एकसारखे चालूच एकसारखे चालूच राहतात. उदा- हरणार्थ विकारवशतेच्या तीव्र प्रभावानें, अथना प्रबल इच्छेचें सबेग स्फुरण झाल्यानें, अन्तराकाशांत मन- स्तरंगांचा अव्याहत उद्भव होऊन, त्यांचा प्रवाह एक- दम बाहू लागतो. अर्थात्, आपले मनोगत व्यक्त कर- ण्याची इच्छा अन्तःस्थित चालकाला झाल्यावर त्याच्या इच्छाशक्तीचा परिणाम मनावर होऊन, हें मन वागिन्द्रि- यांची द्वारे खुली करण्याचा एकदम प्रयत्न करितें. योगानें, हृदाकाशांतील वायु प्रेरित होऊन, वाचेचा आधा- रस्तंभ जो ध्वनि, त्याचे सहजींच बीजारोपण होते. भातां, वास्तविक विचार केला तर असे दिसून येईल की, वाचेच्या बीजारोपणाची हीच प्रथमावस्था असून, तिला परा हें पारिभाषिक नामधेय आहे. पुढे, ह्या अवस्थेतल्या वायूचें स्थलां तर व स्थित्यन्तर होऊन, त्याचा द्वितीयावस्थेत प्रवेश होतो, आणि ह्या स्थितीत त्याला पश्यन्ती म्हणतात. तदनन्तर, इच्छाशक्तीच्या नेटाने, ह्या बायूची एकसारखी प्रगतीच असल्यामुळे, त्याला तिसरी म्हणजे मध्यमाचस्था प्राप्त हो- ऊन, तो मुखबिवरांत लागलींच शिरतो, आणि बाहेर पड ण्याचा प्रयत्न करतो. हे त्याचें चौथें अवस्थान्तर होय, व ह्यालाच वैखरी अशी संज्ञा आहे. ही वैखरी, अथवा हां वायुरूपी ध्वनि, मुखपुटांतून बाहेर पडतांना त्या त्या- -