या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६६ भाषाशास्त्र. तथापि, शब्द अनित्य आहे, अशा आशयाचा पूर्वपक्ष जैमिनीनें केवळ विवाद हेत्वर्थच शब्दाच्या अनि त्यत्वासंबंधी पूर्वपक्ष. स्त्रीकारून, त्याचें त्यानें खंडनही केलें आहे. आणि ज्यापेक्षां, एतद्वियक ऊहापोह भाषाशास्त्राच्या दृष्टीने विशेष महत्वाचा दिसतों, त्यापेक्षां, त्यांतील मुद्याच्या गोष्टींचें येथें थोड़ेंसें तरी दिग- दर्शन झालेच पाहिजे, हे अगदी रास्त होय. आतां, शब्दाची अनित्यता ठरविण्यासाठी, कित्येक असे प्रतिपादन करितात की, शब्द हा कर्म आहे. म्हणजे, तो कृतीनें उत्पन्न होतो. अर्थात्, तो उच्चार केल्याने अस्ति- त्वांत येतो; व तो उच्चारैताक्षणीच ( शब्दध्वनी ) नाश पावतो. यासाठी, शब्द अनित्य समजावयाचा कारण असे की, शब्दाच्या मूळरूपांत भेद किंवा विकृति होते, आणि वृद्धिही झालेली दिसते. उदाहरणार्थ, "स्थिति" व "अन्तर" ह्या दोन शब्दांचे प्रथमचें स्वरूप, अथवा दुसरे १ जमिनीच्या विचारसरणीचे विवेचन करतांना मांधवाचार्यांनी एका प्रकरणाचे नांव अधिकरण असे देविले आहे. ह्या अधिकर णाचे पांच घटकावय खालों लिहिल्याप्रमाणें होत:- T १ विषय, २ संशय, 3 संगति, ४ पूर्वपक्ष आणि ५ सिद्धान्त ह्यांपैकी पूर्वपक्ष म्हणजे विरुद्ध पक्षाचे प्रतिपादन होय, असे समजावें. २ कर्मैके तत्र दर्शनात् ॥ ६ ॥ ( अ० १० १० १. पूर्व- मीमांसा. ) 3 अस्थानात् ॥ ७॥ अ० १ ० पू० मी० ). ४ प्रकृतिविकृत्योच ॥ १० ॥ (अ० १. पा० १० पू० मी० ).. ५ वृद्धिध कर्तृभूम्नास्य ॥ ११ ॥ (अ० १. पा०] १. पू० मी०),