या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३)

तथापि, ते सर्व संस्कृत व तदुदंभृत प्राकृत भाषाविषयकच
असल्यामुळे, पृथ्वीवरील सर्व भाषांचे विवेचन, त्यांचे
शास्त्रीय वर्गीकरण, त्यांची तुलना, त्यांची उपपत्ति,
त्यांचे उद्गमस्थान, त्यांचे स्थलांतर, रूपान्तर, आणि अन्य
ऐतिह्य, इत्यादीसंबंधी हकीकत यांत नाही, हें उघड आहे.
कारण, दळणवळणासारख्या कित्येक हरकतीमुळे, व
अवश्य ती साधने उपलब्ध नसल्याने, ती त्यावेळी बिलकुल
देतांच आली नाहीं; आणि ती देता येणे देखील
अगदीच शक्य नव्हते; हें कोणासही काबुल केले पाहिजे.

    सांप्रतकाळी, सुगमप्रवास, साहसप्राचुर्य, नौकागमन,
लोहमार्ग, तारायंत्र, वगैरे हरएक प्रकारची संपूर्ण अनुकूलता
असल्याने, आशिया, यूरोप, आफ्रिका, अमेरिका,
आस्ट्रेलिया, व अन्य द्वीपसमूह, यांच्याशी आमचा
सतत आणि निकट संबंध होत गेला. त्यामुळे, सर्व
प्रकारची जा; ये , जिकडे तिकडे सुरु झाली; व
मनुष्याच्या ज्ञानभांडारांतही एकसारखी भरच पडत चालली.
    अर्थात, या ज्ञानवृद्धीने शास्त्राच्या प्रत्येक शाखेला
नूतन अंकुर फुटू लागले; आणि त्यासरसें भाषाशास्त्राच्या
प्रच्छिन्न बीजाचेही अपोआपच पोषण होत जाऊन, ह्या
अत्युपयुक्त विषयावर विस्तृत व व्यापक ग्रंथ होण्यास एक
उत्कृष्ट संधी मिळाली.
   ह्या अमुल्य संधीचा सदुपयोग कित्येक पाश्चात्त्यांनी
अगदी वेळेवर आणि चांगल्या प्रकारें केला, याबद्दल
त्यांचे साभार अभिनंदन केले पाहिजे. लीबनिझ सारख्यांनी
ह्या भूतलावरील अनेक देशांतील भिन्नभिन्न भा-