या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ६७ मूलप्रकृति एका प्रकारची असून, त्यांचा संधि होताच त्यांच्या रूपांत " स्थित्यन्तर" अशी विकृति होते. त्याच प्रमाणें, अनेक मनुष्यांनी एकच शब्द उच्चारला असतो, त्याचा अनेकपटीने उच्चार मोठा होतो. अर्थात्, त्या शब्दाची वृद्धि होते, असे म्हणण्यास हरकत नाही. पण, ज्या वस्त॒ची वृद्धि किंवा क्षय होतो, ती वस्तु अनित्य होय. सबब, शब्दहां अनित्यच समजला पाहिजे, असा प्रतिप- क्षाचा आरोप आहे. तथापि, ह्या कोटीक्रमाचें खंडण जैमिन्याचार्य मोठया खुबीनें क्रमशः करितात, आणि असे ह्मणतात की, उच्चार केल्यानंतर शब्द प्रकट झाला असे जर तुमचें ह्मणणे असेल, तर तुमच्याच प्रतिपादनावरून तो प्रकट होण्या- पूर्वी गुप्त होता, ही गोष्ट सहजच निष्पन्न होते. अर्थात्, ह्या विचारसाम्याने शब्दाचें नियत्व सिद्ध झाले, हें उघड आहे. आती, शब्दगुणासंबंधी विचार करितां असे दिसून येतें कीं, शब्द हा गुण आकाशाचा असून, तो नित्य आहे. मात्र, आघातासारख्या निमित्त कारणानें तो व्यक्त होतो; नाही तर, तो केवळ प्रच्छन्नावस्थेतच असतो, असे म्हण ण्यास हरकत नाही. किंबहुना, प्रयोगानंतर त्याचे ज्ञान होते, असे झटले असतांही चालेल. उत्तरपक्षं, अथवा पूर्वपक्षाचे खंडण. १ समतुतत्र दर्शनम् ।। १२ ।। (अ० १. पा० १. पू०मी० ). २ सतः परम् अदर्शनं विषयानागमात् ॥ १३ ॥ ( अ० मी० ) पा० १. ३ प्रयोगस्य परम् ॥ १४ ॥ (अ० १. पा० १.५० मी० ).