या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाशास्त्रः शिवाय, सूर्याप्रमाणेच एकसमयावच्छेकरून शब्द हा सर्वत्र असतो; आणि फक्त वर्णात फेरबदल झाल्यानेंच वर्ण- विकृति होत नाही; हे उघड आहे. त्याचप्रमाणे, शब्द किंवा ध्वनि लहान मोठा नसून, त्याला अवयवही नाहींत. मात्र, त्याचें अणुत्व किंवा महत्व कर्णाकाशाच्या विस्त व संकुचितावस्थेवर अवलंबून असते; व ह्मणूनच त्याची वृद्धि अगर क्षीणता संभवत नाहीं. ह्या सर्व कारणांवरून, शब्द हा निःय असल्याचे उघड होत. . ह्यासंबंधाने आणखी एक गोष्ट विशेष रीतीनें लक्षांत ठेवावयास पाहिजे आहे. ती ही की, शब्दोच्चार होतांच शब्दध्वनि नाहीसा होतो, व लयास जातो. त्यावरून, केवळ शब्दोच्चाराने किंवा शब्दश्रवणानेच कोणताही कार्यभाग होत नाही. तर, जेव्हां ज्ञान उत्पन्न होते, तेव्हांच त्याच्या- योगानें कार्य घडतें. ह्यावरून शब्दध्वनीला पत्व आहे, असे उघड दिसते. अर्थात्, जरी उच्चारलेला ध्वनि नाहींसा होतो, तरी त्यापासून झालेले ज्ञान निलच आहे, असा भावार्थ होय. त्याचप्रमाणे, शंकराचार्यांनी देखील शब्दाचें नित्यत्व मोठ्या जोराने आणि सयुक्तिक री- तीनें प्रतिपादन केले आहे. बादराय णाच्या ब्रह्म ( शारीरिक अथवा वे. शब्दाच्या नित्य- त्वाविषयी शंकराचा- बाँचें मत. ANG पू०मी.). १ आदित्यवद्यौगपद्यम् ||१५|| (अ० १. पा० १. पू०मी० ). २ वर्णान्तरमविकारः ॥ १६ ॥ (अ० १. पा० 3 नादवृद्धिपरा ॥ १७ ।। ( अ० १. पा० १. पू० मी० ). नित्यस्तुस्यादर्शनस्य परार्थत्वात् ॥ १८ ॥ ( अ० १. पा. १. सु. १८ पू. मी. ) Y