या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४)

भाषांचे निरनिराळे शब्दकोश तयार करविण्याच्या कामी अश्रत परिश्रम घेतले; आणि राजे रजवाडे, मुत्सद्दी व कारभारी, धर्मोपदेशक व अन्य सद्गृहस्थ,

यांस वारंवार पत्रे लिहून, तत्संबंधी नेट लाविला. फार तर काय सांगावे पण, 

रूसच्या क्याथाराईन सारख्या पातशाहिणीने सुद्धा, आपल्या अफाट राज्यातील लहान मोठ्या हुद्देदारांस लिहून, पृथक पृथक भाषांतील शब्दसंग्रह मागविला, आणि त्यांचा एक कोशही तयार करविला.

      ह्या कोशापासून सकृतदर्शनी एक मोठाच फायदा झाला. तो हा कीं, 

निरनिराळ्या भाषांतील शब्दांचे साम्य व अर्थसाम्य, यांची तुलना करण्यास फार उत्तम साधन मिळाले. पुढे वॉम्पसारख्या विद्वानांनी हि तुलना शास्त्रीय रीतीने सिद्ध केली; आणि त्यायोगाने संस्कृत, प्राकृत, ग्रीक, ल्याटिन, जर्मन, स्लाव्हॉनिक, इत्यादी भाषांचे निकट साम्य असल्याचे निर्विवाद ठरले.

      तद्नंतर, मॉक्समुलरसारख्यांनी तर भाषाशास्त्रविषयक फारच परिश्रम 

घेतले. त्यांनी ह्यासंबंधाची हरएक प्रकारची माहिती उपलब्ध असलेल्या सर्व ठिकाणाहून मिळवली. इतकेंच नव्हे तर, तिचे त्यांनी परिशीलन करून, त्याजवर अमुल्य व्याख्याने दिली; व ती पुस्तकरूपाने छापून प्रसिद्धही झाली.

      याप्रमाणे, पाश्चात्य देशांत, भाषाशास्त्रावर हल्ली अनेक ग्रंथ झाल्याचे 

सर्वांस मशहूर आहे. परंतु, अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या भारतखंडातल्या देशी भाषेंत कोठेही झाला असल्याचे दिसत नाही. निदान, तो माझ्यातरी