या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ८३ वैय्याकरणांच्या मतें नाम, क्रियापद, उपसर्ग, आणि निपात, ह्रीं तिचीं चार रूपें समजावयाची, मंत्र, कल्प, ब्राह्मण, व लौकिकी, अशी चार रूपें याज्ञिकांच्या अभिप्रायाप्र- मार्गे होत. ऋगू, यजुः, साम, आणि लौकिकी, अर्शी नैरुक्तांच्या मतें बाचेची चार रूपें समजावयाचीं. सर्वांची भाषा, पक्षांची भाषा, तिर्यड्योनीतील क्षुद्र जीवजंतूंची भाषा, व व्यावहारिकी भाषा, असे वाचेचे चार प्रकार असल्याचित्रयों, ऐतिहासिकांचा अभिप्राय आहे. आत्म- बादींच्या मतें, पशु, लूणक, मृग, आणि मनुष्य, यांच्याच चार तूणत्र, भिन्न भिन्न बाचा होत. तसेच, योग्यांच्या मताप्रमाणें, परा, पश्यन्ति, मध्यमा, व वैखरी, हेच वाचेचे चार प्रकार आहेत. . मूलस्थ आधारापासून उत्पन्न झालेली जी नादात्मिका बाणी, तिला परा म्हणतात. जी नादाच्या सूक्ष्मत्वामुळे, योग्यांशिवाय अन्य कोणासही भासमान होत नाही, आणि जी फक्त हृदयस्थच आहे, ती पश्यन्ती समजावयाची. हि- चाच बुद्धीशीं मिलाफ होऊन, जेव्हा तिला विवक्षा प्राप्त होते, तेव्हां तिला मध्यमा म्हणतात; कारण, मध्यस्थ अस लेले जें हृदय त्याच्यापासूनच हिचा उद्गम होतो. पुढें, हिचाच कंठापर्यंत प्रवेश झाल्यावर, ज्या वेळेस दंतौष्ठादि स्थानांचें साहाय्य मिळून ती मुखावाटे बाहेर पडते, त्या वेळेस शिला वैखरी अशी संज्ञा प्राप्त होते. आतां, ह्यांपैकी, पहिले तीन प्रकार हृदयान्तर्गत असल्या कारणानें, ते अर्था त्च गुप्त समजावयाचे; आणि राहिलेला चौथा व शेवटला प्रकार मात्र मनुष्यांची व्यावहारिक भाषा होय, असे योगी मानतात.