पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/११२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९३
सरसा.

 ज्या लेखनपद्धतींत, बोलण्याप्रमाणेंच वाक्यें लिहिलेलीं असतात, किंवा आवेश, कळवळा, प्रेम इत्यादिक मनोविकार दाखविले असतात, त्या पद्धतीस सरसा असें म्हणावें.

 ही दुसऱ्याची मनोवृत्ति जागृत करण्यास उपयोगीं पडते; व हिच्यांत अर्थास प्राधान्य असतें. उदाहरणें–

 १. "रामराव, तुह्मी काय पाहिजे तें म्हणा, पण मी तर बुवा ह्या कामांत एवढं सुद्धां तुमचें ऐकायचा नाहीं. काय हो? तुह्मीं म्हणतां असंच जर कां होतं, तर तो गोपाळ तिथें कां बरं जाता? तो का त्यानें बोलावल्यावांचून गेला असेल म्हणतां? छे! छे! छे! हें संभवतच नाहीं; मला तर! खरंच सांगतों, नाहीं, नाहींच, हें कधीं खरं वाटायचं."

 २. "महंमदाचें सोंग रंगभूमीवर येण्याची केवळ वार्ता मात्र कानीं आली तो मुसलमानांनी आकाश पाताळ एक करून सोडलें आणि महाराज्ञी चक्रवर्तिनीकडून अभय वचन वदवून घेतलें. विबुधजनहो! ह्या गोष्टीवरून त्यांच्या धर्माभिमानाचा चांगला प्रत्यय तुम्हांस आला नाहीं काय? म्लेंच्छ जातींची देखील स्वधर्मावर अशा प्रकारची श्रद्धा तुम्ही प्रत्यक्ष पाहूनही तुम्हांस आपल्या विशुद्ध धर्माचा कांहींच जर अभिमान उत्पन्न झाला नाहीं तर मग तुम्हांस विबुध असें तरी जगांत कोण म्हणेल? ह्याचा तुम्ही कांहींच विचार करूं नये! काय ही तुमची स्वधर्माविषयींची अनास्था! ह्या अनास्थेचा परिणाम खरोखर