पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६९

 ह्यांत हास हा स्थायीभाव आहे.

 विचित्र वेष, चमत्कारिक भाषण, चेष्टा, विपरीत क्रिया इत्यादि, विभाव; व हांसरें तोंड होणें, ( हांसतां हांसतां) टाळी देणें, मानादिक अवयव हलणें, अश्रुपात इत्यादि, अनुभाव; आणेि हर्ष, चपलता, असूया, अवहित्थ, श्रम, प्रबोध, ग्लानि, शंका, आलस्य, इत्यादि व्यभिचारीभाव.

 उदाहरण — "नानाफडनवीस ह्यांच्या पुढें कोणी कशाही हास्याच्या गोष्टी सांगितल्या असतां, त्यांस हसूं येत नसे. एकदां असें झालें कीं एका हरदासनें आज नानांस मी हसवीन असा पण करून कीर्तनांत अनेक प्रकारचे हास्योत्पादक चुटके सांगितले, पण नानांस हसूं येईना; शेवटीं कीर्तनसमातीच्या समयीं, बुवा नानांच्या अगदी जवळ जाऊन हळूच म्हणाले कीं, माझी पराकाष्ठा होती ती मी केली, पण आपल्यास हसूं आलें नाहीं, तेव्हां आतां मी तरी काय मोठ्यानें ओरडून रडू किंवा कसें? हें बुवांचे वाक्य ऐकतांच, नानांस एकदम हसूं आले. तें इतकें कीं, त्यामुळे त्यांच्या नेत्रांतून हर्षाश्रु वाहूं लागले. हें सर्वानीं पाहून बुवांनीं आपला पण सिद्धीस नेल्याबद्दल त्यांची त्यांनी फार प्रशंसा केली."

 ह्यांत हरदासबुवा, ह्या आलंबनविभावाने नानांच्या मनांत हास नामक मनोवृत्ति उत्पन्न होऊन ती बुवांच्या शेवटल्या भाषणरूप उद्दीपनविभावानें उद्दीपित होऊन