पान:भूमी आणि स्त्री.pdf/१२

हे पान प्रमाणित केलेले आहे.

सामाजिक परिवर्तनाचे माध्यम म्हणून राजकारणाकडे पाहणारा हा माणूस म्हणे, 'देव आणि दैव हे दोन्ही दुर्बळांचे घातक असतात.' त्यांना 'रामकृष्णशिवांत' जीवनविषयक दृष्टिकोनातील विश्वात्मकता दिसली होती. भारताच्या सांस्कृतिक एकात्मतेचे प्राणभूत तत्त्व त्यांना त्यात दिसले होते. ते स्पष्ट शब्दात लिहितात, "रामकृष्णशिव ही भारतीयांना पडलेली परिपूर्णतेची स्वप्ने आहेत. भारतनाते आम्हाला शिवाची मती दे. कृष्णाचे अंतःकरण दे. रामाची कृती दे. अपरिमित मन देऊन आमची घडण कर. उन्मेषशाली हृदय दे, पण, जीवन मात्र संयमी कर."
 गेल्या काही वर्षांत धर्म, पंथ, जात, लिंग, भाषा यांच्या नावाने होणारी भांडणे अधिकाधिक तीव्र, छुपी आणि अनेकदा सशस्त्र होत आहेत. हजारो वर्षांपासून संघर्ष - स्वीकार - समन्वय - समरसता यांच्या उभ्या आडव्या धाग्यांनी विणलेले एकात्म संस्कृतीचे वस्त्र चिंधाटले जात आहे. त्यातील 'लोक' हा चिवट व रेशमी धागा 'कच्चा' केला जात आहे. भारतीय संस्कृती, एकात्मता हे शब्द गुळगुळीत नाण्याप्रमाणे अर्थहीन व निःस्पंद झाले आहेत. मतांच्या राजकारणासाठी भारतीय संस्कृतीला वेठीला धरले जाईल की काय असे भय संवेदनशील अभ्यासकांना अस्वस्थ करून जाते.
 दुर्दैवाची गोष्ट अशी, 'हिंदू' हा जीवनप्रणाली जीवनरीती व्यक्त करणारा शब्द, धर्म, राजकारण, समाजकारण यांची समीकरणे मांडण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे जीवनरहाटी... जीवनसरणी दर्शविणाऱ्या या शब्दावर दूषित आवरणे चढली. प्रस्तुत शोधनिबंधाद्वारे भारतातील सांस्कृतिक एकात्मता हाच भारतीय राष्ट्रीयत्वाचा आधार आहे, ही भूमिका मला मांडायाची आहे. त्यासाठी 'ललितलेणी' आणि पू. सानेगुरूजींचे भारतीय संस्कृती' या दोन ग्रंथांनी भक्कम जमीन... भूमी दिली.
 १३व्या शतकानंतर भारतावर झालेल्या आक्रमणात 'धर्म' ही एक महत्त्वाची प्रेरणा होती. लाखोंचे जबरदस्तीने धर्मान्तर केले गेले. काहींना नाईलाजाने स्वीकारावे लागले. काहींनी मनःपूर्वक केले. त्याकाळात धर्माबाबतची तर्कशुद्ध भूमिका घेणारे राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व लाभले असते तर आज ज्या विद्वेषाला, दुहीला. तोंड द्यावे लागते ते द्यावे लागले नसते. असे असले तरी एक बाब लक्षात येते. धर्म

भूमी आणि स्त्री