पान:भूमी आणि स्त्री.pdf/२३१

हे पान प्रमाणित केलेले आहे.

ख्रिश्चन लोक आपला धर्म घेऊन भारतात स्थिरावले. त्यांनी आपले धार्मिक आणि सांस्कृतिक वेगळेपण टिकविण्याचा सतत प्रयत्न केला. तरीही ही माणसे मुळची इथलीच. त्यामुळे येथील लोक परंपरेचा स्वीकार अपवादाने केला. उदा. मराठवाड्यावर निझामाचे राज्य शेकडो वर्षे होते. येथील काही जिल्ह्यांत मार्गशीर्ष अमावास्येला 'इळाआवस' साजरी होते, ती शेतीची पूजा असते. जमिनीची सुफलनशक्ती वाढावी. यासाठीचा हा विधी मुस्लिम शेतकरीही पाळतात. भूमी आणि भाकरीला नसतो धर्म आणि नसते जात.
 सांस्कृतिक विकासक्रमातील 'वर्षगणना' हा महत्त्वाचा टप्पा -
 भारतीय विधी, व्रते, सण, उत्सव निसर्ग नियमांशी, ऋतुचक्राशी जोडलेले आहेत. उत्तरभारतात महिन्याची सुरुवात पौर्णिमेनंतरच्या कृष्णप्रतिपदेपासून सुरू होते. महिन्याचा शेवटचा दिवस पौर्णिमा असतो. दक्षिण भारतात-महाराष्ट्रात महिन्यांची सुरुवात अमावास्येनंतरच्या शुद्धप्रतिपदेपासून होते. शेवटचा दिवस अमावास्या हा असतो. मानवाच्या सांस्कृतिक विकासात वर्षगणना हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. वर्षाचे सर्वसाधारणपणे दोन भाग पाडले जातात. एक उत्तरायण आणि दुसरा दक्षिणायन. आषाढ महिन्यात सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो. तेव्हापासून दक्षिणायन सुरू होते. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हापासून उत्तरायण सुरू होते. गीतेते म्हटले आहे. 'मासानां मार्गशीर्षोहम् ' बारा महिन्यांत श्रेष्ठ पवित्र मार्गशीर्ष महिना. पाऊसकाळ संपतो. थंडीला सुरुवात होते. महाभारत काळात मार्गशीर्ष महिना पहिला धरून वर्ष मोजण्याची प्रथा असावी. मार्गशीर्ष प्रतिपदेस देवदिवाळी असते. पौषात उत्तरायण सुरू होते.
 सर्जनासाठी वर्षनाइतकेच सूर्यबीजाला महत्त्व -
 जमिनीची सुफलनशक्ती वाढावी यासाठी केले जाणारे विधी, व्रते, सण, उत्सवांचे निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की, जमिनीची सुफलनशक्ती वाढण्यास सूर्याचीही मदत होते. सूर्याला बीजस्वरूप मानले आहे. सर्जनासाठी पाऊस जसा महत्त्वाचा तसेच सूर्याची ऊर्जाही महत्त्वाची. सूर्य आणि भूमी यांच्या समागमातून वाढणाऱ्या उर्वराशक्तीशी जोडलेले विधी, सण, व्रते, उत्सव हे मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, चैत्र, वैशाख याकाळात येतात. मराठवाड्यात विशेषत्वाने साजऱ्या केल्या जाणाऱ्या

२२६
भूमी आणि स्त्री