पान:भूमी आणि स्त्री.pdf/२७२

हे पान प्रमाणित केलेले आहे.

पती मिळावा' या सौभाग्यकांक्षेची आणि विवाहितांची असतील त्यांना सौभाग्यरक्षणाची भूमिका दिली गेली. वर्षनाशी जोडलेले विधी, उत्सव मोकळ्या आभाळाखालचे असल्याने, त्यांत मुळातच नृत्य आणि सामूहिक स्वर यांचा यात्वात्मक संबंध असल्याने, पुरुषप्रधानतेतून आलेल्या ताठरपणाला त्यात फारसा अवकाश मिळाला नाही.
 ५. मात्र 'सूर्य' हे बीजरूपी वीर्याचे, पौरुषाचे प्रतीक असल्याने त्याच्याशी संबंधित विधि, उत्सवांत मात्र 'सैभाग्याकांक्षा' जी पतीच्या अस्तित्वाशी पूर्णपणे जोडलेली आहे. ती महत्त्वाची भूमिका झाली. पौषातील रविवार, संक्रांतीचा वाणवंसा, चैत्रगोरीचे हळदीकुंकू ही व्रते आज पूर्णपणे ती करणाऱ्या स्त्रीच्या सौभाग्याशी जोडलेली आहेत.

भूमी आणि स्त्री
२६७