पान:भूमी आणि स्त्री.pdf/९३

हे पान प्रमाणित केलेले आहे.

और व्रजके व्रतमें किंचित हेरफेर के साथ वही रूप लक्षित होता है, जो मालवजन पदमें विद्यमान है। महाराष्ट्र में 'भुलाबाई' और बुंदेलखंडमें 'मामुलिया का स्वरूप इसके अनुरूप है।'

 देखणे अंगण दूर चाललेय का ? -
 'सांझी' आदिवासी भागातही सजवली जाते. आदिमानवाच्या जीवनाची बैठक बव्हंशी समुदायानिष्ठ होती. त्यांच्या सणउत्सवांतून ती प्रतिबिबिंत होत असे. मध्य प्रदेशात आजही सांझीचे सौंदर्य जपलेले दिसते. कर्नाटक वा तेलंगणातील रंगावलीचे सौंदर्य आजही मनाला थक्क करते. राजस्थानातली गणगौरीची सजावट वा आंध्रातील बदकम्माची सजावट पारंपरिक सौंदर्याचा अनमोल ठेवा जपून केलेली दिसते. मात्र महाराष्ट्रातील या कुमारिकांच्या खेळोत्सवांतून ही सौंदर्य दृष्टी कमी होतेय की काय असा संभ्रम पडतो. रीत म्हणून चार रेषा ओढल्या जातात पण नाजूक रेषांनी नटूनथटून बसणारे देखणे अंगण दूरदूर चालले आहे.
 वात्स्यायनाच्या 'कामसूत्रात' उल्लेखिलेल्या ६४ कलांमध्ये रांगोळीचा उल्लेख आहे. रांगोळीसाठी सुरुवातीस धान्याचा उपयोग करीत. ते सुफलनशक्तीचे, कृषिसमृद्धीचे प्रतीक मानीत. आजही विशिष्टप्रसंगी, पूजेच्या वेळी तांदळाचा वा धान्याचा चौक मांडण्याची प्रथा आहे. सरस्वती, शिवलिंग, कामदेव यांच्या पूजनासाठी फुलांच्या आकृती काढीत.७ व्या शतकातील 'वरांग चरित्रात' पंचरंगी चूर्ण, धान्य, फुले यांच्या रांगोळ्यांचे उल्लेख आहेत. १० व्या शतकातील 'नलचंपू' या ग्रंथात उत्सवप्रसंगी घरापुढे रांगोळ्या काढल्याचे लिहिले आहे. १२ व्या शतकातील सोमेश्वराने लिहिलेल्या 'मानसोल्लासात' धूलिचित्र या नावाने रांगोळी

८८
भूमी आणि स्त्री