या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मजूर एक दोन शब्द बोलतांच तिला ग्लानी आली-क्लेश होऊं लागले म्हणजे तिनें बोलूं नये अस वाटे ! " रत्नुनें कांहीं खाल्लय का ? त्याला खायला घाला ! नी बाळ, तूं, सुगंधा देखील खाऊन घ्या ! " आईने आम्हांला सांगितलें. " खरेंच, ऊठ, सुगंधा, चूल पेटवून तांदूळ धुऊन टाक ! कांहीं खाऊन घ्या, सगळींच ! " मी उठलें नाहीं. जागेवरून हलवेचना ! उठायला माझ्या अंगांत शक्तीच राहिली नव्हती ! मस्तक सुन्न झाले होतें. मी उठलें नाहीं. दादा पण कांहीं बोलला नाहीं. भूकतानेवें भान कुणाला होते ? जेवणाची आठवण कुणाला होती ? नी वांहीं केलें असतें तरी तोंडांत घांस तरी कसा जणं शक्य होतें ?- " असें गे काय करतेस सुगंधा ! " मी उठलें नाहीं, हे पाहून जरा वेळानें आई म्हणाली- “ असे करूं नये बाळ ! ऊठ म्हणून मी सांगतें आहे ना ? कांहीं करून खा ! बाळ माझ्या जवळ आहे तंवर ! किनई, माझे आतां पाय गार पडत चालले आहेत ! पोटांत कांहीं असल्याशिवाय दम कसा निघेल तुम्हांचा ! म्हणून सांगतें आहे कांहीं खा !- संतू बाळ. सांग बरें सुगंधा ताईला उठायला ! " आईला बोलवत नव्हतें, तरी एक-- एक शब्द हेंच बोलत होती ! माझ्या हातून कांहीं होणें शक्यच नव्हतें ! पण जीव मुठीत धरून उठलें. म्हटलें रत्नुला तरी कांहीं द्यावें. दूध रात्रींचं होतें. कपात घालून रत्नुला बोलावून त्याला प्यायला दिले. पण तो घेईना. आम्ही अशी आईजवळ मुक्याचें व्रत घेऊन बसलेलों. त्याचा परिणाम त्याच्या मना- वरही फार फार झाला होताच ! मी अगदी त्याच्या पाठीसच लागलें तेव्हां त्यानें कप उचलून तोंडाला लावला-एक घोट घेतला असेल नसेल तोच त्यानें कप खाली ठेवला, नी उठून चालता झाला. दाद च्या पाठीशीं जाऊन बसला ! मी उठलें ! चुलीकडे मला नुसतें पहावेना देखील !