या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२)

भेटी दिल्या आहेत, तीं सर्वच भावंडे आमच्याकडे आलीच असें नाहीं, ज्यांची जेथे गांठ पडली, तेथेच त्यांचा परामर्ष घेण्यांत आला आहे.
 महाराष्ट्र-कुटुंब- मालेवर सुरुवातीपासूनच सर्वोचें अतोनात प्रेम आहे. 'मालेच्या' जन्माची जाहिरात फडकून अल्प काळ झाला, तितक्या अवकाशांत आश्रयदात्यांच्या सप्रेम उड्या पडल्या. 'माले'चा ' मजूर शक्य तितक्या त्वरित, आणि ठरल्यावेळीं व शक्य तितका सुन्दर तयार करण्याचे काम मित्रवर्य श्री. रा. गणेश काशिनाथ गोखले सेक्रेटरी श्री गणेश प्रिंटिंग वर्क्स' यांनी तत्परतेनें, प्रेमानें, आपलेपणानें केल्या बद्दल मालेनें त्यांचें आजन्म ऋणीच राहिले पाहिजे.
 'माले ' चा 'मजूर' प्रेसमधून फक्त आठच दिवसांत बाहेर पडल्या- मुळे, आम्ही किंवा 'प्रेस'नें कितीही दक्षता ठेविली तरी चुका राहणें अपरिहार्य झालें याकडे लक्ष देऊन प्रिय वाचक चुकांबद्दल क्षमा करतील असा भरंवसा आहे.
 ईश्वरोकृपा, स्नेह्यांचें सहाय्य, आश्रयदात्यांचा सक्रिय वाढता उत्सा• इच आम्हांकडून हरिः ॐ म्हवूणन हा ' मजूर ' हातीं देण्यास लाववून या शुभक्षण आम्हांला अपरिमित आनंद उपभोगावयाला लावीत आहे.
 नूतन संवत्सरारंभाचा हा शुभक्षण 'माले'ला व मालेच्या सर्व हित- चिंतकांना कल्याणप्रद होवो !

बुधबार वर्ष प्रतिपदा
१८४७

सर्वांचा नम्र

पुणे ३९१ नारायण, पुणे.

विठ्ठल रामचंद्र खाडिलकर