या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १३ वै.

१३३

भिऊं नगस बघ ! - " आणखी एका मजुरानें त्याला सहानुभूति दाखवून, निर्भय करण्याचा प्रयत्न केला !
 मॅनेजरचे डोके गरगर फिरायला लागलें.
 ह्या गांवठी सायबाजवळ कांहींच नाहीं जणू. त्यो काय देतोय अन् तुम्ही काय घेताया ! त्यातनं त्यो चांगलाच झिंगलाय ! सायचा ! वाट- बीट तर चुकला नाहींस १ बरा अजून गटार सोबती झाला नाहींस. तुझ्यावाणी कैक साच गटारांत लोळत्याती - आम्हींच त्यास्नी गटारांतून काढून त्येंच्या मकाणाला पोचवितों. रोज तुमच्या गंमती आम्हीं बघतों न्हव का !- पडचील बघ हातच कुठे गटारांत - गवसल का घर ? नाहीं तर कुठे राहतोस सांग - आम्हीं कुणी तुला नेतों तुझ्या घरला ! तिथें गेल्यावर विडी शिरगट- माचिस दिली तरी बी चालेल ! -ये ह्या, जा सायेबाला घेऊन त्येच्या माळ्यावर ! सायबा, कुठे राहतोस रे ! तांबट गल्लीत, का उंबरखाडीत १ का मजगांवांत १ का चकल्या मोहल्यांत १ मग मर्दा, लई भकाणलास र १ हाकडे सायबा बावूरनाथाला भेटायला निघाला हुतास का ! ये ह्या, जा ह्यला घेऊन ! "
 मजूर चांगलेच कुलुीला आले होते. हलकेहलके मॅनेजरला याच्या- वरून त्याच्यावर ढकलायला सुरवात केली. खुशालचंद रडकुंडीला आला. संतापला, पण करतो काय? त्याची अशी हबलंडी चालली असतांच, एक मजूर म्हणतो, 'अरे, असे का साहेबाचे हाल करतां ? वरडल, गणेशटेब- लाला ( कॉन्स्टेबल. ) बवील - मग व्हईल तुमची गंमत बघा ! "
 " वरडतुया व्हय ! एक मानेंत बुक्की घालीन, तर गप्प बस- वीन ! वरडतुया, मग निशापाणी करून झिगावं कशाला ? " दुसन्यानें पहिल्याला उत्तर दिलें. ढकलाढकलीचा क्रम चालूंच होता. खुशालचं- दाची टोपी पडली ! कोट फाटण्याच्या बेताला आला ! अखेर गयावया करून तो मजुरांना म्हणाला-
 " अरे बाबांनो, मी तुमच्या पायां पडतों ! माझे असे हाल करूं नका ! मी निशापाणी केली नाहीं. झिंगलों नाहीं. या समोरच्या बंगल्यांत कांहीं कामाकरितां मी निघालों आहें ! मजजवळ विडी काडी आतां कांहीं