१५३
कशाबद्दल मुलाखत होती ? " इन्स्पेक्टर विचारीत होते.
" गिरणीच्या संपाच्या बाबतीत बोलायचें होतें !
शेटजीना कांहीं माहिती हवी होती. आणि शेटजी मला कांहीं सांगणार होते !"
" गिरणीच्या संपाशीं तुमचा काय संबंध ? "
" संपांत मी मजुरांच्या बाजूनें काम करीत असतों ! " 'तुम्ही कोणत्या गिरणीत असतां ? "
" शेटजींच्याच 'उच्छाराम भाई-- मिलमध्यें ! "
" मुलाखतीच्या वेळीं आपल्या दोघांशिवाय कोणी नव्हते ?
" सुरवातीला तास सव्वातास, शेटजींचे हे चिरंजीव आणि त्यांची ती मुलगी - दोघेही होतीं ! "
" मग १ "
(मग शेवटपर्यंत आम्ही दोघेच होतों ! "
मुलाखत बरीच कडाक्याची झाली असेल ? "
" कोणत्या अर्थाने आपण विचारतां ? " दादा जरा या वेळीं चपापला !
" नाहीं म्हणजे - शेटजी गिरणीवाले-तुम्हीं मजूरपक्षाचे ! मुलाखत " संपा'बद्दल ! म्हणून विचारलें !
मुलाखतीचा सामना - " सलोख्याचाच होता ! "
मुलाखत किती वेळ चालली होती ? "एक वाजेपर्यंत ! "
" आणि मुलाखत चालली असतांच शेटजींवर पिस्तूल झाडलें गेले का ? "
" नाहीं ! "
मग १ कसें काय झाले ? तुम्हांला सांगतां येईल ? "
"आम्ही एक वाजण्याचा ठोका ऐकून 'मुलाखत' संपविली आणि शेटजी झोंपावयाला जाण्याकरितां उठले ! मी उठून जिना उतरूं लागलों. तीनचार पायऱ्या गेलो असेन -नसेन इतक्यांत पिस्तुलाचे तीन चार बार झाले ! आणि शेटजी ' अरे बापरे मेलों 'घांबा' म्हणून ओरडले ! मी मागे वळून पाहातों, तों शेटजी धडपडत जाऊन त्या कोचावर जाऊन पडले!! त्यांच्या ओरडण्याबरोबर मी निमिषमात्रच जागच्याजागी थब-