या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६२
मजूर

 " yes ! right ! तुमचें म्हणणें बरोबर आहे ! डोके ठिकाणावर असणार कुठून ? वडलांसारख्या वडिलांचा बोलत चालत बदमाष मजु- नजर खून केला जाऊं द्या ! भाईसाहेब, आतां मन आवरलेंच पाहिजे. झाली गोष्ट परत येत नाहीं ! " मॅनेजरचें कांही केल्या तोंड थांबत नव्हतें ! कुठें खून झाला, किती वाजले होते - पोलिस केव्हां आले, संतुला पकडलें, हें योग्य झालें ! आतां मजुरांना दहशत बसेल- कदाचित् संप आणखी लांबेल- एक ना दोन-मोठ्या कळकळीचा आव आणून हजार बडबडी चालल्या होत्या !
 शेटजींच्या खुनाची बातमी अल्पावकाशांत मुंबईभर झाली होती ! वाईट बातमी तेव्हांच पसरते. तिला मुळींच वेळ लागत नाहीं. मुंबईच्या दैनिकांतून " शेट इच्छारामभाईंचा शोचनीय खून " " माथेफिरू मजु- रांचा निंद्य अत्याचार !” “गिरणीवाल्यांनो, आतां तरी सावध व्हा ! " इत्यादि मथळ्याखालीं संध्याकाळपर्यंत शेटजींच्या खुनाबद्दल मजकूरही आला होता ! गिरणीवाल्यांचा पक्ष घेणाऱ्यांनी मजुरांच्या या अत्याचारा- बद्दल मजुरांच्या सगळ्या मागण्या फैंटाळून लावा - उपाशी मरूंद्या, वठणी- वर असेच येऊ द्या ! असें लिहिलें होतें. तर मजुरांचे कैवारी म्हणवि- णाऱ्या पत्रांतून " शेटजींच्या खुनाची हकीकत ऐकून वाईट तर वाटलैंच पण असे खून होईपर्यंत, आणि मजुरांना खुनाला प्रवृत्त करीपर्यंत मजु- रांचा अंत पाहिला, हेंच चुकलें. आतां तरी गिरणीवाल्यांनीं आपली चूक शुद्धीवर येऊन सुधारावयाला नको काय ! हाच हट्ट, आणि हीच बेफिकीरी इतउत्तर गिरणीवाले मजुरांच्या संबंधांत दाखवितील, तर आणखी मजुरांच्या संतापाला किती गिरणीवाल्यांना असेंच बळी पडावें लागेल, हें सांगतां येत नाहीं ! इकडे श्रीमान् गिरणीवाल्या बंधूंनीं आतां अवश्य लक्ष पुरविलें पाहिजे ! व्यक्तिशः इच्छाराम भाईबद्दल आम्हांला अत्यंत पूज्यभाव होता ! आणि त्यांच्यासारख्या दिलदार. उदार, निःपक्ष- पाती व्यक्तींचांच माथेफिरू मजुरानें खून केल्याबद्दल मनःपूर्वक आम्हांला वाईट वाटत असून, सदर खुनी मजुराबद्दल तिरस्कारच ' वाटत आहे ! "