या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण १९ वें.

१९१

संकटाचे राक्षसी

काळेकभिन्न मेघ वितलून जाऊन दादा आपल्या चारित्र्य नें पवित्र्शनें पोर्णिमेच्या पूर्ण चंद्राप्रमाणे, धवल यशानें प्रेमळ, स्निग्ध, आचरणानें समाजांत तळवूं लागला ! प्रतिकूल परिस्थि- तीशीं टक्कर देऊन परिस्थितीलाच च्छित्रविच्छिन्न करून टाकलें. कुठल्याही कठीण परिस्थितीच्या आहारी दादा गेला नाहीं ! तर परि- स्थितीलाच आपल्याकरितां त्यानें बदलावयाला भाग पाडलें !

दादाशिवाय भाईचे पान हालेना, आ ण भाईशिवाय दादाला क्षण-

भर चैन पडेना. बबूताई - आणि मी आमचें साम्राज्य तर काय विचारा. बयालाच नको ! रत्नूची खरी गम्मत ! आम्हां दोघीला जितका वैताग आणण्याची पाळी आणी तितका जरी ददा व भाई यास नसे, तरी त्यांचा पिच्छा पुरविल्याखेरीज सोडीत नसे ! दिवसभर हंसे काय, नी खिदळे काय ? एकाद वेळीं' त्याचा जास्तच उच्छाद वाटला, तर मी त्याला धाक दाखविण्याचा आव अणी, पण हेही बबूताईला किंवा भाईला खपत नसं !-' असूं दे ग मूलच आहे. चालायचेंच एवढाही दंगा त्यानं करायचा नाहीं तर काय आतां आपण करायचा ? " एकंदरींत दादाची उजळमाथ्यानें कोर्टात सुटका झाली, आणि आमच्या आयुष्यक्रमाची दिशा एकदम बदली! खूनाच्या वृथारोपा. पासून दादा सुटला नसता तर आम्हां सर्वांच्याच आयुष्याची इतिश्री झाली होती म्हणण्याची ! पण ईश्वराच्या मनांतून आम्हांला कांही निरा- ळेंच दाखवावयाचे होतें यांत झंका नाहीं !

  1. sahe