या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ५ वें.

४७


वैर बांधण्याची कल्पना मनांत येऊ द्यायची नाहीं, अशी अहोरात्र आम्हां भावंडांना आमच्या देवतातुल्य आईची शिकवण असे. आणि ती शिक- वण आतां अगदीं आमच्या अंगवळणीच पडल्यासारखी झाली होती. आम्हांला आईच्या आज्ञेप्रमाणे वागण्यांत आनंद वाटत होता, व आम्हीं तसे वागतों, हें पाहून आईला नित्य सात्विक समाधानाचा लाभ होत होता. असो.
 मुंबईला आल्यापासून पांच वर्षाच्या अवधीत नित्याच्या आयुष्य- क्रमापलिकडे आजपर्यंत विशेष कांहीं झालें नव्हतें, तें आकस्मिक, आज एका दिवसांत, एका दुपारपासून घडून आलें होतें. आईचा आजार आज जास्त एकाएकी वाढला नसता, तर हेंही होत नव्हतें ! पण, आज त्या मोटारींतल्या गृहस्थाची गांठ व वर्तन, दादाच्या इच्छाराम- भाई - मिलच्या मॅनेजरशीं तो संबंध, घरीं एका शाळेतल्या मैत्रिणीचें कोट्याधिश असलेल्या मैत्रिणीचें अनाहूत आगमन आणि खऱ्या बाळ- मैत्रिणीला साजेसे तिचे वर्तन, हीं सर्व एका अवघ्या तीनचार प्रहराच्या अवर्धीत घडल्यामुळे त्या सर्वांचा माझ्या मनावर विलक्षण परिणाम झाला होता. रात्रीं निजेपर्यंत दुपारपासून घडलेल्या गोष्टींचीच सीनेमा *फील्मप्रमाणें मनश्चक्षुपुढून पुन्हा पुन्हा चित्रे सरकत होतीं. बबूताई घरीं गेल्यावर आम्ही जेव्हां वर आलो, तेव्हां दुपारपासूनची साग्र हकीकत माझ्या मनाच्या अभिप्रायासुद्धां दादाला नाहीं तरी तीनचार वेळां सांगि तली. मी शक्य तितकी प्रत्येक हकीकत जशीच्या तशीच सांगण्याचा प्रयत्न करीत होतें. कारण मला भावी आयुष्यांत बडी लेखिका व्हाव• याचें आहे हें मी विसरले नव्हतें ! दादा पण माझी सर्व हकीकत लक्ष- पूर्वक ऐकत होता. माझ्याचप्रमाणें मोटारगाडीतल्या माणसाची हकी- कत सांगत असतां दादाला विस्मय वाटला, तर मॅनेजर खुशालचंदाच्या माकडचेष्टांचें वर्णन केलें तेव्हां तर तो पोट धरधरून हंसला.
 रात्री झोपेंत मला दिवसाच्या हकीकतीचींच स्वप्ने पडत होतीं. कित्येक तर दादा म्हणत असतो, त्याप्रमाणें आम्हीं मोठे होण्याच्या मार्गाला लागण्याची हीच तर सुरवात नसेल ! - मोटारींतल्या माणसांनीं