या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८
मजूर


प्रकृतींत आताशा वरचेवर असाच चढउतार होत असे. उष्टींखरकटीं झांकापाक करून अभ्यासाची पुस्तकें घेऊन आईच्या जवळ जाऊन बसलें. रत्नुका घटकाभर 'श्रीगणेशा' पाटीवर देऊन अभ्या- साला बसविला.
 आईच्या सांगण्यावरून तिच्या करमणुकीकरितां 'संतलीलामृत ' वाचावयाला घेतलें. आईला कंटाळा येईपर्यंत वाचावयाचें असेंच ठर- विलें होतें. एक तासभर वाचलें. वाचतां वाचतांच आईचा डोळा लागला. रत्नुही 'श्रीगणेशा' गिरवितांगिरवितां झोंपी गेला ! माझे डोळे पण जड व्हावयाला लागले होते, तोंच अगदीं कालच्याच वेळेला बबूताई दार उघडून आत आली !-