या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ७ वें. ६७ माझ्या तोंडांतून निघाला. मी विजेचा झटका बसल्याप्रमाणें होऊन उठून उभी राहिलें ! “ अरे ! ती ही ! - " मला पहातांच भाईचाही असाच उद्गार बाहेर पडला ! आमचे दोघांचे असे एकार्थीच उद्गार ऐकून, व परस्परांना पाहतांच दोघांचीही जीस्थिती झाली ती पाहून, "तुला इतकें आश्चर्य कसले वाटलें ? मी तुला सांगत होतें, तीच ही माझी मैत्रिण ! हीच माझी बहिण ! -" बबूताई भाईला माझी ओळख करून देऊं लागली. “ असे का ? – काय चमत्कार आहे पहा !-बबूताई, काल ज्या मुलीची म्हणून मी तुला गोष्ट सांगितली - जी वाटेंत मूच्छित पडली होती नी जिला मी सावध करून मोटारीतून गिरणीपर्यंत घेऊन गेलों, तीच ही तुझी मैत्रिण !” भाईनें मजकडे पहात बबूताईला माझी कालची ताजी ओळख पटविली ! कालच्या संकटांतून सावध करणारा, आपल्या मोटारीतून गिरणी- पर्यंत नेणारा परोपकारी थोर पुरुष - मोटारीतला माणूस, तोच हा बबू- ताईचा भाई ! थोरांचें अंतःकरण खरेंच थोर असतें ! बबूताईच्या भाईला पाहिल्यावर काल त्याला पहातांच मला जें एक विलक्षण गूढ पडलें होतें, तेही चटकन् यावेळीं उलगडलें ! भाईला कुठे तरी पाहिल्या- सारखे वाटत होतें - परिचय असावा अशी जी शंका येत होती, त्याचें निराकरण आतां झालें. कालपर्यंत भाईला जरी मी पाहिले नव्हते, तरी बबूताई माझी शाळेतील मैत्रिण होती. तिच्या चेहऱ्यांत, व भाईच्या चेह न्यांत विलक्षण साम्य होतें ! पाहिल्यासारखे वाटे तें त्यामुळे ! पण लक्षांत कसें येणार ? काल घरी आल्यावर, व घरीं बबूताईला पाहिल्यावर माझ्या डोक्यांत तोच प्रश्न पुन्हां उद्भवायला पाहिजे होता. पण दुसरीच परिस्थिति निर्माण झाली, आणि मी तें त्या वेळेपुरतें विसरूनही गेलें ! पण आज सूर्य जयद्रथ समोरासमोर पाहतांच गूढ एकदम उकललें ! मग भाईला बबूताईनें आणखी माझी माहिती करून दिली. माझी हुशारी, माझ्या दादाचा गोड स्वभाव – आईची करुणाजनक स्थिति - गरीबींतही निर्व्याज आनंदांत राहण्याची आमची हातोटी- या सर्वांचें