या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १११ )



खेड्यांत अफगाणी भाषा चालते. - येथें बाबराची कबर • आहे. ती आलीं जाऊन पाहिली. शिकारपूरच्या एका व्यापान्याने मला सांगितलें कीं, काबुलामध्ये इंग्लं दांत तयार झालेला माल दरसाल सुमारे ३००००० रुपयांचा खपतो, व रुशियांतला सुमारें २००००० रुप यांचा खपतो. काबुलाचे एकंदर उत्पन्न २५००००० रुपये आहे. - काँबुलांत वसंतऋतूची मोठी मजा असते. जिकडे तिकडे तऱ्हेतऱ्हेच्या रंगांची फुलेंचफुले होऊन जातात. हिंवाळ्यांत थंडी फार असून बर्फही पडत असतें. तेव्हां लोक बकऱ्यांची कातडी पांघरतात. आणि कधीकधी चाळीस चाळीस दिवसपर्यंत त्यांस - घरांच्या बाहरे पडवत नाहीं. तेणेंकरून गरीब लो- कांस निर्वाहाची मोठी मारामार पडते. •• मे, १८३३.
 बामियन. - ह्याच्या दक्षिणेस टेकडीवर शंभर शंभर फूट उंचीचे तीन दमडी पुतळे कोरलेले आहेत. व ह्यांच्या डावे बाजूस गुहेमध्ये सुंदर कोरीव लेणें आहे. हें पांडवकृत असावें, असें सांगतात. - बामियानच्या ईशान्येस शहरगुलगुला हाणून एक किल्ला आहे. तो बहुत वर्षांपूर्वी काफरानें बांधिला. बदकशान येथील वार्तारानें तो घेण्यासाठीं त्यास वेढा घातला. त्याचे होते तितके उपाय सरले. आणि आतां वेढा उठवून निघून जाणार, इतक्यांत त्याला आंतल्या काफर सर- दाराच्या मुलीचें पत्र पोंचलें. तिचें मन त्यावर फिदा झालें होतें. ह्मणून तिनें त्या पत्रांत, किल्ला सर करण्याची युक्ति त्यास लिहिली होती. तें पत्र असें.