या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४० )



रीस आणिलें. तेव्हां तो शरण आला. अकबरानें त्यास • अपराधांची क्षमा केली, परंतु कामावरून काढून टाकिलें.
मावजीम म्हणून कोणीएक मनुष्य अकबराचा दूरचा तो आपल्या बायकोचे अतिशपित हाल करी. हें गाहाणें तिचे नातलगांनी अकवरास सांगून • बंदोबस्त करण्याविषयीं विनंती केली. एके दिवशीं शिकारीस जात असतां त्याचा त्याच्या घरीं गेला.त्यास पाहातांच त्याच्या येण्याचा मतलब समजून, मवजम धांवत धांवत आपले माडीवर गेला, आणि तेथें त्याची बिचारी बायको बसली होती, तिचा कट्यारीनें गळा कापून त्याने प्राण घेतला. अ- कबर आत शिरत आहे तो मवजीम तरवार बांधून त्या- शीं लढण्यास तयार झाला; व त्याच्या गुलामानें बाद - शाहावर तरवारही उगारली. थोडें चुकलें, नाहींतर अकबर त्यादिवशीं खचीत प्राणास मुकता. हैं दुष्ट कर्म पाहून बादशाहास फार राग आला, व त्यानें मवजीम ह्यास यमुनेमध्यें, खाली डोके वर पाय करून ढकलून द्यावें, असा हुकूम केला. त्याप्रमाणे लोक त- त्काळ करूं लागले. तें पाहून अकबरास त्याची दया आली; आणि त्यानें तें शासन त्या प्रसंगी न करतां त्यास कैदेत ठेविलें. तो तेथेंच वेड लागून मरण पावला.
  अकबरानें गुजराथ, सिंध, कंदाहार, दक्षिण वगैरे प्रांत जिंकून घेतले, ह्यावरून तो शूर होता, ह्याविषयीं कोणीही संशय घेणार नाहीं. ह्यांतील लढायांतही त्याने धूर्तता, सहनशीलता, व निरभिमानीपणा, हे आपले गुण