या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४१ )




अनेकवेळां प्रकट केले. प्रत्यक्ष त्याच्या मुलानेंही बंड केलें होतें तें त्याने मोठ्या युक्तीनें मोडिलें. इतक्या गोष्टींवरून अकबर हा कोण आणि कोणत्या प्रकारचा मनुष्य होता हैं थोडें बहुत तरी वाचणारांच्या लक्षांत येईल. तो इ० स० १६०५ च्या अक्तोबरच्या १३ व्या तारखेस, स्वस्थ चित्तानें, आपल्या कुटुंबाच्या माणसांचा व दरबारच्या सरदारांचा निरोप घे- ' ऊन, आपल्या अपराधांबद्दल त्यांची क्षमा मागून, आणि मोठ्या धार्मिक मुसलमानाप्रमाणें निमाज पढून मरण पावला. अकबराचा बांधा मजबूद व सुंदर, मु. `खचर्या मनोरंजक, व चालचर्या चित्तवेधक अशी असत./ विद्येची गोडी त्याला फार होती. तो रात्रीच्या रात्री शास्त्रीय विषयांवर संभाषण करण्यांत घालवी. जनावरां. च्या झोंब्या व पैलवानांच्या कुस्त्या त्यास पाहण्यास फार / आवडत. हा एकदां लगत २ दिवसांत ११० कोस घोड्यावर बसून गेला. प्रसंगोपात्त तो १५ किंवा २० कोस एका दिवसांत पायीं मजल करी. तो खाणें मध्यम प्रतीचें खाई. अकबराची बरोबरी करणारे असे राजे ह्या भूमंडलावर प्राचीन काळीं फारच थोडे होऊन गेले असतील, हल्लीं थोडेच असतील, व पुढेही थोडेच हो- बील, असें झटल्यास कांहीं चिंता नाहीं.


इतिहासांचे संक्षिप्त टिपण.


 इतिहास हें अनुभवशास्त्र आहे. आणि अनुभव सर्वांस पाहिजे. तेव्हां, इतिहासाच्या मोठेपणाविषयों यथें लिहिण्याचें कारण नाहीं.ज्यांची टिपणें आतां आह्मी