या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६७ )


च दिसून आली. तो साहा सात वर्षांचा असत एके दिवशी आपल्या आईजवळ जेवावयास बसला होता. तेव्हां कुतस भाकरीचा तुकडा द्यावा ह्या हेतूनें त्याने तो आपले हातांत धरून त्याच्या पुढे केला. त्या अधाशी प्राण्याने तो त्याचे हातांतून घेतांना दातांनी त्याची करांगळी फोडिली. रक्ताची धार लागली. हे आपले आईला समजलें तर आपले मोत्यास मार बसेल, असें मनांत आणून त्या धीट मुलानें हात तसाच आपल्या रुमालाने बांधिला; आणि आपण स्वस्थ बसला. जेवीत कां नाहींस, असें त्याचे आईने त्यास विचारिलें; तेव्हां तो बोलला, आईग, मला आतां भूक नाहीं, माझें पोट भरलें. त्याची कांहीं प्रकृति विघडली असेल, असें तेथच्या जवळच्या माणसांस वाटून, तीं त्याला वारंवार विचारूं लागलीं. तरी तो सांगेना. तथापि रक्त फार गेल्यामुळे त्याचे तोंड अगदीं फिके दिसूं लागलें. इतक्यांत ती जखम एका नौकराच्या दृष्टीस पडली.ह्या प्रसंगीं चार्ल - मला दुखापत कर सास असें वाटलें कीं, कुतन्पाने ण्यासाठीं, बुझ्या दंश केला नाहीं; त्याजकडून तो चुकून झाला आहे, त्या अर्थी त्याला शिक्षेस पात्र करण्या- पेक्षा आपणाला मरण आले तरी बेहतर.
 हे दोन गुण जर मनुष्याच्या अंगी असले, आणि जर त्यांचा उपयोग त्याला नीट करतां आला, तर त्यांपासून किती चांगले परिणाम घडून येतील बरें ! चार्लसाला सुशिक्षण मिळाले असते तर तो लोकांस अत्यंत आनंददायक होऊन त्या काळी महान कीर्ति-