या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 "पाकिस्तानातल्या सामान्य माणसांना भारतातील लोकांबद्दल खूप खूप प्रेम आहे. येथील जीवनाबद्दल उत्सुकता आहे. तेथील स्त्रिया तर रस्त्यातून जाताना थाबून थांबून चौकशी करीत. एक गोष्ट माझ्या मनात खूप बसली की तुम्ही कुठेही जा. अगदी कराची, लाहोरसारख्या शहरांत किंवा खैबर खिंडीतील लहान लहान वस्त्यांवर. स्त्रियांचा पोषाख अगदी अंग भरून असतो. बुरखा बाहेर जाताना जरूर घालीत असतील. पण शेतात, घरात काम करताना बुरखा घालून कसे चालेल ? पण त्यांची ओढणी अतिशय नेटकेपणाने माथा झाकून घेतलेली असते. कुठेही शरीराचे प्रदर्शन नाही."
 माझी मैत्रीण गेल्या डिसेंबरमध्ये दहा दिवस पाकिस्तानात जाऊन आली होती. ही मैत्रीण मुंबईकरीण. लिप्स्टिक, क्रीम, सेंट या बाबी दैनंदिन गरजेच्याच मानणारी. अशीच कुटुंबे भवताली राहणारी. आजकाल महानगरातील सर्वसामान्य समाजात या 'वस्तू' जीवनावश्यक झाल्या आहेत. आम्ही दिल्लीला पुरस्कार घेण्यासाठी गेलो होतो तेव्हाची गोष्ट. मी आणि माझ्याबरोबर पुण्याकडील खेड्यातून बालसदनचे बालमजुरांच्यासाठी शिक्षणाचे काम करणाऱ्या एक बाई. तिथे एका विख्यात कार्यकर्त्याच्या घरात आमची सोय केली होती. कार्यकर्ते व कुटुंब

मनतरंग / १०६