या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आज समोर उभ्या असलेल्या सकिनाला मी क्षणभर ओळखलंच नाही. बरोबर सात वर्षांचा देखणा साकीब ऊर्फ बोस्की.
 "मॅडम पहचाना नाही ? मै सकिना. आपकी विद्यार्थिनी और...
 "अब आया यादमे"
 विद्यापीठातून एम.एस्सी. ची पदवी प्रथम वर्गासह मिळवली होती आणि या पदवीच्या दागिन्यावर तिला अमेरिकेत नोकरी करणारा भारतीय मुस्लिम इंजिनिअर पती मिळाला. सकिना आपल्या पतीवर खूष होती. अमेरिकेतील मनमोकळ्या वातावरणात ती मनापासून समरस झाली. अमेरिकेत नोकरी मिळण्याच्या दृष्टीने तिने अभ्यास सुरू केला आणि लक्षात आले की, ती 'आई' होणार आहे. पहिले बाळंतपण माहेरी व्हावे हां सकिनाचा आग्रह. तिच्या पतीला ही मागणी फारशी पसंत नव्हती. पण त्याने मान्य केले आणि सकिना भारतात आली.
 अमेरिकेतील पती-पत्नीच्या संसारातील मोकळेपणा आणि भारतातील सासरचे पारंपरिक वातावरण यात जमीनअस्मानाचा फरक होता. गरोदर स्त्रियांचा आहार, नि घ्यावयाची काळजी याबाबतच्या तिच्या नव्या कल्पना आणि घरातील

एक देश : एक कुटुंब कायदा/१३३