या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
तिला सापडते का तिला हवे असणारे आभाळ ?
आम्ही २१ व्या शतकात आहोत.
"...पिता रक्षति कौमारे, भर्ता रक्षति यौवने
स्थविरे रक्षान्ति पुत्रा; न स्त्री स्वातंत्र्यमर्हति..."
हा पाठ किती दिवस गिरवणार आम्ही ?
अशा हजारो पार्वती, सलमा, ग्रेस, पंचशीला, अशा वगैरेवगैरे जणी. त्यांचे पुढे काय ? त्यांनी घेतलेले शिक्षण फक्त कागदावरचे ? शिक्षण म्हणजे परिवर्तन; शिक्षण म्हणजे जाणिवांचे जागरण. शिक्षण म्हणजे आत्मभान; शिक्षण म्हणजे वगैरे...वगैरे की उत्तरांच्या शोधात फिरणारे त्रिशंकू प्रश्न ?...?
■ ■ ■
मुकं आभाळ / ४३