या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग २ रा. तें केसांवर हात फिरवीत मला चुंचन देऊन ह्मणाली, “पिरोज्, या तुझ्या चारच शब्दांनी मला किती समाधान झालें आहे ह्मणून सांगूं. माझ्या मनांत जें संशयाचें काहूर उठलें होतें तें एकदम नाहींसें झालें. तुझ्या प्रेमाची मी भुकेली आहे. जगात दुसरी कोणतीही गोष्ट मला अधिक प्रिय नाहीं. तुजकरितां मी वाटेल तें साहस करीन. वाटेल तीं संकटें सोशीन. परंतु तूं असा स्वस्थ बसलास ह्मणजे मात्र माझा सर्व धीर खचतो आणि माझ्या सर्व आशा विरघळून जातात. तुझें मन अस्वस्थ होणे हे अगदीं स्वाभा- विक आहे. आपल्या कमनशीबानें तुला कोणाचा आधार नाहीं. दुर्दैवानें परीक्षेतही दोन तीन वेळां प्रयत्न करून तुला यश आलें नाहीं. माझ्या आईबा- पांची आपल्या लग्नाला संमती नाहीं. असल्या स्थितीत मनुष्य कितीही धीराचा असला तरी तो उदास होईल. तथापि तूं धीर सोडून चालणार नाहीं. माझ्या सर्व आशा, सारी उमेद तुजवरच अवलंबून असणार आणि तूंच जर असा धीर सोडूं लागलास तर मीं कोणाच्या तोंडाकडे पहावें ! तें असो. मीं बरोबर शराब आणली आहे ही अगोदर थोडी घे झणजे तुझी उदासीनता नाहींशी होईल. " असें ह्मणून तिनें जवळच्या बॅगमधून एक बाटली काढून तीतील शराब ग्लासांत ओतून मला दिली. त्यापुढे माझा धर्म, माझी लाज यांचा पाडाव होऊन आजपर्यंत कधींही स्पर्श न केलेल्या त्या पेल्याचा मीं मुकाट्यानें घोट घेतला. थोड्याच वेळानें आणखी एक घोट दिल्यावर माझ्या अंगांत अपरिचित तरतरी व जोम येत आहे असे मला वाटलें. तिने आपला आवाज ओळखला नाहीं हें पाहून मला बोलण्यास अधिक हुशारी आली. हा माझ्या अंतःस्थितीत बदल झालेला माझ्या चेहऱ्यावरून तिनें ताबडतोब ताडला तेव्हां धक्यावर असलेल्या जॉली बोटींत बसून जलक्रीडा करण्याची तिनें आपली इच्छा प्रदर्शित केली. आजूबाजूला असलेल्या मंडळींच्या योगानें माझ्या मनाला जो संकोच वाटत होता तो नाहींसा करण्यास ही चांगलीच युक्ति होती. त्या कारणाने तिच्या ह्मणण्यास अगदीं कांकूं न करितां मीं एकदम रुकार दिला. व आह्मी दोघेही लागलींच एक जॉली बोट ठरवून जलपर्यटणास निघालों. रात्रीचा समय, समुद्रावरील मंद मंद वारा, चंदनाप्रमाणे शीतल असा ८