या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रसंग २ रा.

ही गोष्ट कोणत्याही आईबापांना खपणार नाहीं. पण लेकरांनीं त्यांना न कळतां कितीही अपराब केले तरी त्याबद्दल क्षमा करणें हें आईबापांचें कर्तव्य असते. तेव्हां शिरीन्वर तिच्या आईबापाच्या रोषाचें आहेले हैं आगंतुक संकट ह्मणण्यासारखें भयंकर नव्हते. पण माझी स्थिती मात्र अत्यंत कठीण झाली होती. आपल्यामुळेच या अल्लड पारशी तरुणीला आपल्या आईबापांचा रोष करून घ्यावा लागला तरी रात्रीं तिघ्या खऱ्या प्रियकराशींच तिची भेट झाली असती तर तिला दुसरे दिवशीं आई- बापांच्या रोषाचें फारसें कांहीं वाटले नसतें; पण आपणच तिचा प्रियकर पिरोज आहों असें लबाडीनें भासवून तिला बिनाकारण फर्शी पाडलें असें तिच्या ध्यानांत आले तर तिला अतोनात बास होईल. तिनें आपलें प्रेम तिच्या दृष्टीनें योग्य ह्मणून ठरविलेल्या एका तरुणाला अर्पण केले अस- तांना केवळ तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आपण नीचपणाने तिला भुरळ घालीत आहों बगैरे गोष्टींबद्दल त्यावेळी पश्चाताप वाटून मला मनस्त्री दुःख झालें; पण त्याचा तादृश उपयोग मात्र झाला नाहीं ! वास्तवीक पाहतां त्या तरुणीप्राप्ती संबंधानें कोणत्याही प्रकारची आशा मनांत न धरितां त्या तिथींचें लक्ष्य चुकवून ताबडतोब तेथून चालतें व्हावें अर्से मला पुष्कळ वेळां वाटले असूनही तशी कृती मात्र माझ्या हातून घडली नाहीं ! कारण

परस्त्रीचा अभिलाष धरून पाहिजे तें निंद्य कर्म करायला तयार

होणाऱ्या बदफैली माणसाला किंवा दारूनें वेळोवेळी झिंगून आपल्या सर्वस्वाची माती करूं पाहणाऱ्या माणसाला आपलें आचरण पशुतुल्य आहे हे चांगले समजत असतांना तें सोडून देण्याला तो मनुष्य सहसा तयार होत नसतो. हाच न्याय थोड्याशा फरकानें मलाही लागू होण्या- सारखा होता. परस्त्रीला वश करणें हा जरी तसल्या घाणेरड्या कर्मात आपले आयुष्य वेचणाऱ्या कांहीं नीच माणसाप्रमाणे मी आपला व्यव साय बनविला नसला तरी असल्या अमंगल कर्माच्या भयंकर परिणामाचें चित्र माझ्या डोळ्यापुढे उभें राहिलें असतांनाही त्या तरुणीचा नाद सोडून देण्याला मी तयार झालों नाहीं ही मोठ्या शरमेची गोष्ट होय ! फेट्मध्यें मौज पहात असतांना त्या तरुणीचा जर मी अभिलाष धरिला