या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३

मयाची माया.

वरचेवर सप्रेम पाहून गालांतल्या गालांत हंसत आहे असं मला वाटे ! हें पाहून माझा आनंद गगनांतही मावेनासा झाला होता. तिच्या मनांतील हेतू काय होता है कांहीं माझ्या लक्षांत आलें नाहीं. तिच्या नादांत मी आतां अगदीं गुंग होऊन गेलों होतां; व त्यांतून त्या कामी- एखाद्या वेड्याप्रमाणे माझ्या मनाची स्थिती बनविण्याच्या काम-मझिरेनं मला चांगलीच मदत केली होती. आपल्याबद्दल तिला संशय येईल की काय; अशी माझ्या मनाचा इतका वेळ आश्रय करून राहिलेली भीती आतां हळू हळं नाहींशी होऊन तिची जागा भरून काढण्याचा यत्न वेड्या आशेनें चालविला होता; आणि शेवटीं शिरीनला वश करण्याच्या प्रचल विकारानें मनांत असलेले इतर सर्व विचार पार घालवून दिले ! शिरीनबरो- बर पाहिजे तिकडे जावयाला मी आतां अगर्दी एका पायावर तयार झालॉ. सुंदर स्त्रियांचा -- तरुणींचा -- मोह मोठा कठिण आहे ! या मोहाला आजपर्यंत हजारों मी मी झणणारे, वैराग्याच्या यथास्थित गप्पा मारणारे कित्येक पुरुष बळी पडत आले आहेत; हल्लीं पडत आहेत; व पुढेही पडतील. या मोहाच्या नादी लागणारांना शेवटीं नेहमीं पश्चात्ताप करण्याचीच पाळी येत असते असें आजपर्यंतच्या जगाच्या अनुभवाव रून प्रत्येक मनुष्याला कळलेले असूनही प्रसंग पडला ह्मणजे असल्या श्रेष्ठ अनुभवाला आपल्या पाया खालीं तुडविण्याला प्रत्येक मनुष्यानें तयार व्हावें हें केवटें आश्चर्य ! असो. 66

तिची विनंती ऐकतांच मला अतोनात आनंद झाला व

मी हंसत हंसत तिला किंचित् बारीक स्वरानें ह्मणालों, शिरीन, तुझी मर्जी असेल त्याप्रमाणे मला तूं हुकूम कर. व तो मला नेहमीं शिरसावंद्य आहे असें ! मला विनंती करावीस अशी माझी योग्यता नाहीं ! यजमानीणीनें कधीं आपल्या नोकराला- आपल्या चंद्या गुलामाला- विनंती केल्याचें आजपर्यंत कोणाच्याही ऐकिवांत नाहीं ! तूं मनांत आणशील, ह्मणशील, सांगशील तें बजावण्याला - मग तें कितीही कठीण, भयंकर, अशक्य असो ते लागलीच करण्याला - हा तुझ्या पायाचा दास केव्हांही मार्गे पुढे पहाणार नाहीं !! " अर्से तिला लागलीच अश्वासन देऊन मी आपली पेटी ( शिरीनने मला नुकतीच