या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रसंग ४ था.

बरें वाटू लागलें. मी बसलों होतों तेथेंच आपल्या जवळची पेटी ठेविली होती. दारांतून पुन्हां आंत जातांना तो शिपाई पाठमोरा झालेला माझ्या दृष्टीस पडला; व त्यावेळों त्याच्या हातांत माझ्या पेटीसारखी एक पेटी असावी असे मला वाटले. पुन्हां मी पूर्वीप्रमाणे आपल्या जागी जाऊन बसलों. यावेळी माझ्या पेटीबद्दल मला थोडीशी शंका आली होती; पण माझी पेटी मी ठेविलेल्या ठिकाणोंच होती. त्या पेटीचें महत्व मला अतीशय होतें; कारण शिरीनने दिलेल्या जिनसा तिजमध्ये ठेवल्या होत्या व त्यांचें रक्षण करणे हे अत्यंत जरूर होतें. तेव्हां पेंटींत जिनसा आहेत की नाहीं, ती पूर्वीप्रमाणे जड आहे की नाही हे पाहू- ण्यासाठीं ती मी हातांत घेतली. पण मला कोणतीही शंका आली नाहीं म्हणून ती उघडून पाहण्याच्या भरीस त्यावेळी मी पडलों नाहीं !

आतां मी चांगला शुद्धीवर येत चाललों होतों. ते ठिकाण, व आतां-

पर्यंत घडलेली सर्व हकीकत माझ्या ध्यानात येऊन ही कांहीं तरी दग्याची जागा असावी अशी कल्पना एकाएकी माझ्या मनांत आली ! आह्मी बोळांत शिरण्यापूर्वी माझ्या दृष्टीस पडलेला पारशी गृहस्थ-शिरी- नचा प्रियकर - तेथें कोठेंच दिसला नाहीं; पण तो कोण, कोठें गेला वगैरे हकीकत त्या स्त्रियांना विचारण्याचें मला धैर्य होईना. आमचें मद्यपान वगैरे झाल्यानंतर तो शिवाई परत आला व लागलीच कपडे वगैरे ठेवण्याची पेटी तो घेऊन गेला. यानंतर थोड्या वेळानें तो पारशी तरुण समोरच्या दारानें येऊन आंत डोकावल्याचा मला भास झाला ! त्याला पाहतांच ल्यूसी व माणकचाई त्याच्याकडे गेल्या व शिरीन माझ्याजवळ येऊन बसली. त्याला पाहतांच पुन्हां माझें मन आश्चर्यानें व भयानें अस्वस्थ होऊन गेलें; व तोच विकार माझ्या चर्येवर त्यावेळी उमटला असावा. कारण, शिरीन माझ्याजवळ येतांच मला ह्मणाली “ पिरोज, या परक्या ठिकाणीं जरी मी तुला आणले तरी येथें भिण्यासारखें कांहीं एक नाहीं हें तूं पक्के लक्षांत ठेव. माझ्या जिवांतजीव आहे तोपर्यंत, जॉपर्यंत माझा तुला कंटाळा आला नाहीं तोपर्यंत तरी निदान तूं पाहिजे त्या ठिकाणी असलास, प्रसंगविशेष माझ्यासाठी तुला पाहिजे त्याठिकाणी यावें जावें लागलें, किंवा हवें

२८