या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया जीनी मला चसण्याउठण्यासाठी जागा दिली होती. तेथे जाऊन मी दिवा लाविला, व आपले कपडे काढून बिछान्यावर पडलों. पहाट झाल्यामुळे देवडीवरील गडी आतां जागे होऊन आपापल्या कामाला लागले होते. बिछान्यांवर पडतांच आपल्याला चांगली झोप येईल असे मला वाटत होतें; पण तसें न होतां रात्रभर घडलेल्या गोष्टी डोळ्यांपुढे दिसूं लागल्या. त्यांतच मद्याचा अंमल आतां मला चांगला जाणवू लागला होता आणि शिरीन व पिरोज एकमेकांच्या हातांत हात घालून माझ्यापुढे उभे असून पिरोज क्रुद्ध दृष्टीनं माझ्याकडे पहात आहे; व तो आतां आपल्याला मारणार असा विचित्र देखावा डोळ्यापुढे दिसूं लागला ! चिंता, भय, आशा. व आनंद अशा निरनिराळ्या विकारांनी मन अगदीं अस्वस्थ होऊन गेलें होतें; आणि त्यांतल्यात्यांत कधींही माहीत नसलेल्या अशा त्या मयाच्या अमलानं तर त्याची इतकी कांहीं ओढाताण चालविली होती कीं, त्या विलक्षण त्रासानें मी अगदीं संतापून गेलों होतों. एकदां आपल्याला कोणी तरी उंच उंच उचलून नेत आहे व लागलीच आपण एकाएकी एकदम खालीं आइळत आहो असा भास होई. मदिरेच्या व्यसनांत दंग होणाऱ्यांना या बाबतींतला माझ्यासारख्या नवख्या मनु- ब्यानें आपला अनुभव सांगण्याचें कांहीं कारणच नाहीं; असो. 3 अशा स्थितींत मी बिछान्यावर पडलों असतांना गाडीचा घोड्याच्या टापांचा आवाज माझ्या कानी आला. नंदशंकरशेटजी सुरतेहून कांहीं आज यावयाचे नव्हते. तरी कोणाची गाडी आली असावी असा विचार करीत मी सज्जांत येऊन पाहतों तो ती गाडी. आमच्याच दारापुढे उभी राहिली. व तिजमधून एक पारशी, एक गुजराथी, एक मुसलमान व एक घाटी असे चार प्रकारचे तरूण बाहेर पडले. व त्यांना काय वाटले असेल तें वाटो; पण त्यांपैकी एकटा पारशी मात्र आमच्या दरवाजाजवळ आला आणि खालीं असणान्या एका गडचाशीं तो कांहीं वेळ बोलत उभा राहिला. बाकीचे तिथे इसम लागलीच गाडींत जाऊन बसले. यावेळी चांगले उजाडले होते व त्या पारशी तरुणाचा चेहरा मला चांगला ओळखतां आला. हा पिरोजच ! पण यावेळी हा येथें कां आला असावा; आणखी याच्याबरोचर हे तीन इसम कोण याचा मला कांहीं