या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग ९ वा. " वरं तर मी ह्मणतों कीं, तुला वेळ असला तर आपण गाडी करून फिगयला जाऊं. आतां सरासरी तीन वाजून गेले असतील. आपण दोन तीन लास कोठून तरी फिरून येऊं, आपाखी मग आपलं ठरलं आहे त्याप्रमाणं फेट पहायला जाऊं. " ७४ .60 लें सारं होईल रे पण तं आज जेवला नाहींस याची काय वाट ! " " अॅ: त्याचं काय मोठसं. वाटेत कुठे तरी एखाद्या चांगल्याशर दुकानांत जाऊन फराळ करूं ह्मणजे झालं. " " बरं तर. " असे बोलत बोलत आह्मी एका व्हिक्टोरियाजवळ गेलों; आणि हँगिंग- गार्डन' असें गाडीवाल्याला सांगून आह्मी गाडीत बसलों व गाडी चालूं ●लागली. वॉर्टेल एका फराळाच्या दुकानापाशीं गाडी उभी करवून दोबांचा यथास्थित फराळ झाल्यावर पुन्हा गाडींत बसून निघालों; आणि कांहीं वेळानें हैंगिगगार्डनवर जाऊन पोंचलों. आह्मी गाडीत होतो तितक्या वेळांत माझ्या मनांतली गोष्ट काढून घेण्याचा मनुभाईनें पुष्कळ यत्न केला; आणि त्या गोष्टीचे त्याला खरं वर्म कळले नसावें असें मी सम- जत हातां. त्यानें अगर्दी खोदून खोदून मला पुष्कळ प्रकाराने विचारून पाहिले; पण शिरीनच्या पत्राशीं माझा काय संबंध होता, ही शिरीन कोण, कोठली, तिचें माझ्यावर आणि माझे तिच्यावर प्रेम कसें जडलें--- इतकेच नव्हे तर तिची आणि माझी ओळख केव्हां, कुठें, कशी झाली- है देखील मी त्याला समजू दिले नाहीं. मेडिकल कॉलेजमधून आह्मी गाडींत बसून निघालों तेव्हांपासून आमच्या माडीमार्गे दुसरी एक गाडी येत होती. फराळाच्या दुकानाशीं आमची गाडी उभी राहिली तेव्हां मात्र आमच्यामागे असलेली गाडी मध्येंच कोठें तरी दिसेनाशी झाली होती. पण आह्मी फराळ करून पुन्हा गाडींत बसून निघालों तेव्हां पुन्हा ती गाडी पूर्वीप्रमाणे आमच्या मागून येतांना मीं पाहिली; व हँगिंगगार्डनजवळ आमची गाडी उभी राहतांच आमच्या मागल्ग बाजूला ती गाडी थांबली आणि तिच्यामधून दोन गुजराथी तरुण स्त्रिया खाली उतरल्या. आमच्याप्रमाणे त्याही बागेत इकडे तिकडे हिंडन होत्या. बरीच संध्याकाळ झाली तेव्हां आह्मी दोघे .