पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नियमांना मान्यता देऊन हे नियम ताबडतोब अंमलात आणण्याचा आदेश दिला. मराठी साहित्य महामंडळाच्या ज्या लेखनविषयक १८ नियमांना शासनाने मान्यता दिली ते नियम पुढीलप्रमाणे आहेत. १) अनुस्वार नियम १ :- स्पष्टोच्चारित अनुनासिकांबद्दल शीर्षबिंदू द्यावा. उदा. - तंटा, चिंच, आंबा, गंगा, घंटा, पंडित. अनुनासिकाबद्दल विकल्पाने परसवर्ण लिहिण्यास हरकत नाही, पण मराठी (देशी) शब्दांच्या बाबतीत अनुस्वार शक्य तो परसवर्णाने दाखवू नये. मात्र संस्कृतातील शब्द मराठीत जसेच्या तसे आले आहेत ते ( तत्सम) शब्द परसवर्णाने लिहावयास हरकत नाही. नियम २ :- य्, र्, ल, व, श्, ष, स् ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल संस्कृतप्रमाणे केवळ शीर्षबिंदू द्यावा. उदा.- सिंह, संयम, मांस, संवाद, संसार, संस्था, संस्कार. नियम ३ :- नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा. उदा. लोकांना, मुलांनी, तुम्हांस, लोकांसमोर, घरांपुढे... हा अनेकवचनसूचक अनुस्वार अस्पष्ट उच्चार असतांनाही द्यावा. उदा : मुलांना, घरांस, गावांमध्ये, त्यांना, त्यांच्यामुळे इ. नियम ४ :- वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे अनुस्वार देऊ नयेत ५