पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७) श-ष-स च्या संभ्रमातून होणाऱ्या चुका. विषद (विशद), सुश्रुषा ( शुश्रुषा), विषेश (विशेष) ८) ऊ - वू च्या संभ्रमातून होणाऱ्या चुका. जेऊन (जेवून), धुवून (धुऊन), गावून (गाऊन) ९ ) वर्णविपर्ययातून होणाऱ्या चुका. चिटकविणे ( चिकटविणे ), सहाजिक ( साहजिक ), . फाकट (फाटक ) १०) अ-अ च्या संभ्रमातून होणाऱ्या चुका. आर्वाचीन (अर्वाचीन), अहेर (आहेर ), अवश्यक (आवश्यक) काही लक्षणीय शब्दांचा निधी १) उपसर्गघटित शब्दांत हस्व इकार व उकार. 'अति- अतिस्नेह, अतिरेक, अतिशयोक्ती, अतिशय: अधि-- अधिकार अधिमती, अधिदैवत. अनु अनुरूप, अनुभव. अभि- अभिमान, अभिधान, अभिज्ञ, अभिव्यक्ती. नि- निधन, निमग्न, निबंध. परि परिसमाप्ती, परिवर्तन, परिच्छेद. प्रति- प्रतिबिंब, प्रतिशब्द, प्रतिपादन, प्रतिवृत्त. सु- सुदिन, सुप्रभात, सुगंध. वि- विनाश, वियोग, विख्यात, उत्-दु- उत्तेजन, उद्घाटन, उत्कर्ष. ११