पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विरामचिन्हांचा अभ्यास : शुद्धलेखनात विरामचिन्हांना विशेष महत्व आहे; पण आपण गंभीरपणे विरामचिन्हांची दखल घेत नाही आणि त्यांचा वापरही करीत नाही. मराठीत एकूण विरामचिन्हे किती असा प्रश्न विचारला तर मतभेद होतील वा त्याकडे लक्ष न पुरविल्यामुळे सांगणेही जड जाईल. पण जाणकारांची अपेक्षा राहील की योग्य तेथे 'स्वल्पविराम' वा 'अर्धविराम च असला पाहिजे. लेखनात याकडे फारसे लक्ष दिले जात नाही असे आढळते म्हणून येथे तपशीलवारपणे नित्याच्या परिचयाच्याच का होईना पण विरामचिन्हांचा अभ्यास सादर केला आहे. 5 १) पूर्णविराम (.) अ) विधान किंवा वाक्य अर्थदृष्ट्या पूर्ण झाले हे दाखविण्या- साठी पूर्णविराम (.) हे चिन्ह दिले जाते. उदा : मी सकाळी उठते. आ) शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्याक्षरानंतर पूर्णविराम (.) हे चिन्ह दिले जाते. . उदा : ता. क. = ताजा कलम भा. व्यं.. २) अर्धविराम (;) = भास्कर व्यंकट दोन छोटी वाक्यें, ' आणि, य, पण इत्यादी' उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतांना अर्धविराम (;) हे चिन्ह दिले जाते. उदा : अभ्यासाला उशिरा सुरुवात झाली; पण ती पास झाली. १.८