पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३) स्वल्पविराम ( 6 ) अ) एकाच जातकुळीतील किंवा समान अर्थी शब्द, प्रतिशब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम (, ) हे चिन्ह दिले जाते. उदा : फुले नाजुक, सुकुमार, सुंदर, हसरी असतात. आ) आवाहनात्मक संबोधन दाखवितांनाही हे स्वल्पविराम (, ) चिन्ह दिले जाते. उदा : विवेक, खेळायला जा. विदुला, अभ्यास कर. विश्वजित, शाळेत जा. ४) अपूर्ण विराम ( : ) अ) वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा झाल्यास अपूर्ण विराम ( : ) है चिन्ह वापरतात. उदा : पुढील क्रमांकाच्या विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या : १०, ५०. आ) दोन सुट्या, वेगवेगळ्या कल्पना किंवा स्वतंत्र विचार अनुबंधांसह मांडावयाचे झाल्यास अपूर्ण विराम ( : ) हे चिन्ह वापरतात. उदा : मराठी कथा : एक दृष्टिक्षेप. ५) प्रश्नचिन्ह (?) ज्यात प्रश्न विचारला आहे अशा वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक ( ? ) हे चिन्ह वापरतात. उदा : तू अभ्यास केलास ? १९